JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Video : पोलिसांसमोर टोइंग व्हॅन कर्मचाऱ्याची गुंडागिरी; दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण

Video : पोलिसांसमोर टोइंग व्हॅन कर्मचाऱ्याची गुंडागिरी; दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण

पुण्यातील हडफसरमध्ये टोइंग व्हॅन कर्मचारी व दुकानदार यांच्यात रस्त्यावरच फ्री स्टाईल हाणामारी झाली.

जाहिरात

टोइंग व्हॅन कर्मचाऱ्याची गुंडागिरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 1 मे : नो पार्कींगमध्ये उभी असलेले वाहन टोइंग करताना अनेकदा वाद होतात. अशा वादाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. आता असाच एक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे. शहरात टोइंग व्हॅन कर्मचारी व दुकानदार यांच्यात जोरदार भांडण झालं. दुकानदाराने धक्का देत कर्मचाऱ्यांवर विट उगारली. याच रागातून कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांसमोर दुकानदाराला कपडे फोटेपर्यंत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार हडपसर मधील महादेवनगर परिसरात घडला आहे.

संबंधित बातम्या

काय आहे प्रकरण? रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या कर्मचार्‍यांनी दुकानदाराला मारहाण केली. शनिवारी  सकाळी हडपसर मंडईजवळ दुचाकीचा अडथळा असल्याच्या कारणावरून दुकानदाराला वाहतूक पोलिसांच्या कर्मचार्‍यांकडून शिवीगाळ व मारहाण करण्याची घटना घडली. त्याबाबत या व्यापार्‍याने तक्रार केली असून या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. वाचा - धक्कादायक! वाहनात हवा भरली नाही म्हणून पंक्चर दुकानदारालाच संपवलं रमेश बराई यांचे फुटवेअरचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर दुचाकी खाली पडून पेट्रोल गळत होते. ती उभी करीत असताना टोइंग व्हॅन आणि पोलीस कर्मचारी महिलेसह गाडी उचलणारे तरुण खाली उतरले. त्यावेळी एकाने दुकानदार बराई यांच्याशी वाद घालत थेट मारहाण केली. त्यावर बराई हातात वीट घेऊन त्या तरुणावर धावून गेले. मात्र, कर्मचारी तरुणाने आणखी शिव्या देत शर्ट काढून बराई यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. ही घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली. तोच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या