लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 30 एप्रिल : नाशिक शहरात खुनाची एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील टाकळी गावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर तिघा मद्यपींनी एकाची हत्या केलीय. वाहनात हवा भरण्याच्या किरकोळ वादातून पंक्चर दुकानदारची भोसकून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी 29 एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुलाम रब्बानी असे हत्या झालेल्या पंक्चर काढणाऱ्या युवकाचे नाव असून तो मूळ बिहारचा रहिवासी आहे. नाशिक छत्रपती संभाजी नगर रोडवर असलेल्या जेजुरकर लॉन्स जवळ सव्वा दहा वाजेच्या सुमारास वाहनात हवा भरून दिली नाही यावरून त्यांचा वाद झाला. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हल्लेखोरांनी पंक्चर दुकानदाराच्या छातीत धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. 2 लाखाच्या कर्जाची एवढी मोठी परतफेड! 40 वर्षीय व्यक्तीचं 11 वर्षाच्या मुलीसोबत लग्न, आता म्हणतो… शहरात गेल्या तीन दिवसांत खुनाची ही दुसरी घटना घडली आहे. शहरातील आडगाव पोलीस ठाण्यातील कोणाची घटना घडली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान ,रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर हवा भरण्याच्या उद्देशाने गॅरेजवर आले, यातून वाद होऊन तिघांनी गॅरेज चालकावर हल्ला केला. यानंतर हल्लेखोर त्या ठिकाणावरून पसार झाले होते. पोटात व छातीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविण्यात आली. आडगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघा संशयतांना ताब्यात घेतले आहे.घटनेनंतर संशयित फरार झाले होते; मात्र त्यातील तिघा संशयितांना पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.