JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Thane : वेटरला ATM कार्ड दिलं आणि त्यानेच घात केला, पोलीसही नेपाळपर्यंत पोहोचले आणि...

Thane : वेटरला ATM कार्ड दिलं आणि त्यानेच घात केला, पोलीसही नेपाळपर्यंत पोहोचले आणि...

ठाण्यातील एका हॉटेलमध्ये वृद्धाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या वृद्धाची हत्या हॉटेलच्या वेटरने केली. एवढच नाही तर हत्या केल्यानंतर वेटरने वृद्धाच्याच पैशांनी ऐश केली आहे.

जाहिरात

ठाण्यामध्ये वृद्ध व्यक्तीची हत्या, वेटरने काढला काटा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विनोद राय, प्रतिनिधी ठाणे, 14 जून : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये वृद्धाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या वृद्धाची हत्या हॉटेलच्या वेटरने केली. एवढच नाही तर हत्या केल्यानंतर वेटरने वृद्धाच्याच पैशांनी ऐश केली आहे. याप्रकरणी वेटरला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. आपलं एटीएम कार्ड आणि त्याचा पिन नंबर देण्याची किंमत ज्येष्ठ नागरिकाला चुकवावी लागली आहे. वृद्ध व्यक्तीने अत्यंत विश्वासाने त्याचं एटीएम कार्ड आणि पिन नंबर पैसे काढण्यासाठी हॉटेलच्या वेटरकडे दिले, पण त्याच वेटरने वृद्ध व्यक्तीची हत्या केली. हत्येनंतर वेटरने एटीएम कार्ड घेतलं आणि त्यातल्या पैशांमधून मौज केली. 27 मे 2023 रोजी ठाण रेल्वे स्टेशनजवळ प्रिन्स रेसिडेन्सी या हॉटेलच्या रुम नंबर 303 मध्ये काराभाई रामभाई सुवा नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. काराभाई यांचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता, त्यामुळे खळबळ उडाली होती. बँक मॅनेजरच्या पत्नीची 6व्या मजल्यावरून उडी, 2 वर्षांपूर्वी झालं लग्न, चिठ्ठीत लिहिलं… ठाणे नगर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. हॉटेलचा वेटर घटनेच्या दिवसापासून फरार असल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला तेव्हा वेटर रत्नागिरीला असल्याचं निष्पन्न झालं. रत्नागिरीमध्ये आरोपीने मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरलं आणि त्यातून 80 हजार रुपये काढले. पोलिसांची टीम रत्नागिरीमध्ये पोहोचण्याआधीच आरोपी गोवामार्गे कर्नाटकला पोहोचला. यानंतर तो आपल्या गावी उत्तर प्रदेशला गेला, त्यामुळे ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठले. उत्तर प्रदेशातून आरोपी नेपाळला गेला तेव्हा पोलीस त्याची वाट बघत गावातच थांबले. ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश एसटीएफची मदत घेत 26 तास आरोपीची वाट पाहिली आणि 6 जूनला त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपी वेटरने मृत व्यक्तीने आपल्याला पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड आणि पिन नंबर दिल्याचं सांगितलं. मृत व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये भरपूर पैसे असल्याचं पाहून आपल्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यातूनच आपल्या हातून ही हत्या झाल्याचं त्याने मान्य केलं. आरबीआय तसंच वेगवेगळ्या बँकांकडून आपलं एटीएम कार्ड आणि पिन नंबर कुणालाही देऊ नका, असं वारंवार सांगितलं जातं, पण तरीही काराभाई रामभाई सुवा यांनी त्यांचं कार्ड आणि पिन वेटरला दिला, ही चूक त्यांच्या जीवावर बेतली आहे. अनाथाश्रमात बालपण ते प्रियकराकडून क्रूर अंत, Mira Road Murder Case ची Inside Story

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या