नवी दिल्ली 26 जून : दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुमधून राशिद नावाच्या एका व्यक्तीस अटक केली आहे. दिल्लीतील एका घरात सीसीटीव्ही (CCTV) फिक्स करण्याच्या बहाण्याने राशिदने याचा अॅक्सेस आपल्या मोबाईलमध्ये घेतल्याचा (Access of CCTV on Mobile Phone) आरोप आहे. त्यानंतर, त्याने सीसीटीव्हीमधील घरात उपस्थित पत्नी व पत्नीचे खासगी व्हिडिओ (Intimate Video) मोबाईलच्या सहाय्याने रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर नंतर त्याने लाखो रुपयांची मागणी करुन या जोडप्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ‘पायल रोहतगीला अटक करण्यासाठी पोलिसांनी घेतले पैसे’; संग्राम सिंगचा मोठा आरोप दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी दक्षिण दिल्ली येथे राहणाऱ्या एका जोडप्याने त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाल्याची तक्रार केली होती. ज्या कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे त्या कंपनीकडे याची तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्त करण्यासाठी टेक्निशियन (CCTV technician) पाठवला. पैशापुढं मैत्री हरली; मुंबईत युवकांनी लोखंडी रॉडनं वार करत मित्राचं डोकं ठेचलं याच दरम्यान टेक्निशियननं कॅमेरा दुरुस्त करतानाच सीसीटीव्हीचा अॅक्सेस आपल्या मोबाईलमध्ये घेतला आणि तिथून निघून गेला. काही महिन्यानंतर या जोडप्याच्या मोबाईलवर त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ येऊ लागले. यासोबतच त्यांना धमकी दिली गेली, की 3 लाख रुपये न दिल्यास हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जातील. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत राशिदला बंगळुरुमधून अटक केली आहे. राशिद मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. पूर्वी राशिद दिल्लीतच काम करत होता, त्याच वेळी त्याने ही घटना घडवून आणली होती. लॉकडाउननंतर तो नोकरी सोडून बंगळुरूमध्ये कामाला लागला होता. पीडित पती आणि पत्नी दोघेही नोकरी करतात. मुलगी घरात एकटीच राहते आणि तिची काळजी घेण्यासाठी मेड ठेवण्यात आली आहे. म्हणूनच घरात सीसीटीव्ही बसविण्यात आले. परंतु आरोपी राशिदने सीसीटीव्हीवरुन आपल्या मोबाईलवर अॅक्सेस घेतला आणि या जोडप्याचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरवात केली. सध्या आरोपीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्या मोबाईलवरुन पोलिसांनी अनेक व्हिडिओ मिळाले आहेत. पोलीस सध्या याप्रकरणाची चौकशी करत आहेत.