JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / बाप लग्न करून देत नाही म्हणून....; बुलढाण्यातील हादरवणारी घटना

बाप लग्न करून देत नाही म्हणून....; बुलढाण्यातील हादरवणारी घटना

मुलाने आपल्या जन्मदात्या बापासोबत धक्कादायक कांड केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 3 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. बलात्कार, आत्महत्या तसेच अनैतिक संबंधातून हत्या यांसारखे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधांतून खुनाच्याही घटना घडत असल्याचे दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप लग्न करून देत नाही म्हणून एकाने बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण घटना - बाप आपल्या मुलाचे लग्न करून देत नाही म्हणून एका मुलाने आपल्या बापाचाच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आली आहे. दोन्ही बाप-लेक् एका वीट भट्टीवर काम करायचे. आरोपी मुलाचे वय 40 वर्ष आहे. मुलगा चाळीस वर्षाचा झाला तरी बाप लग्न करून देत नसल्याने मुलगा भानसिंग भैरड्या याने वडील नानसिंग भैरड्या याच्या डोक्यात काठी मारून त्याचा खून केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तसेच आरोपी मुलास ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या