JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / पतीच्या 'त्या' एका सवयीमुळे पत्नी आणि भावजयी जीवावर उठली; आधी जादूटोणा केला अन् नंतर थेट हत्याच

पतीच्या 'त्या' एका सवयीमुळे पत्नी आणि भावजयी जीवावर उठली; आधी जादूटोणा केला अन् नंतर थेट हत्याच

बहुचर्चित सुरजीत हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तीची पत्नी, भावजयी आणि सुपारी किलरसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जानेवारी : नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बहुचर्चित सुरजीत हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तीची पत्नी, भावजयी आणि सुपारी किलरसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सुरजीत याला दारूचे वेसन होते. तो शेतीमधून मिळालेले सर्व पैसे दारू पिण्यासाठीच खर्च करत होता. त्यामुळे घरात कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सुरजीत याची पत्नी आणि भावजयी हेच त्याच्या जीवावर उठले, आधी जादूटोणा केला आणि नंतर सुपारी देऊन त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. सहा आरोपींना अटक ही घटना उत्तर प्रदेशच्या शाहजहापूरमधील आहे. 27 जानेवारीला बरेलीच्या फरीदपूरमध्ये सुपारी किलरने सुरजीत याला प्रथम दारूमधून गुंगीचे औषध दिले. जेव्हा सुरजीत बेशुद्ध पडला तेव्हा त्याला रेल्वे रुळावर आणून टाकरण्यात आले. पुढे रेल्वे अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे प्रकरण जलालाबाद पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोसनगर गावातील आहे. काही दिवसांपूर्वी गोसनगरचे रहिवासी असलेले शेतकरी कमलेश्वर यांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

दोन लाखांमध्ये हत्येची सुपारी त्यानंतर पोलिसांना रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असता तो कमलेश्वर यांचा मुलगा सुरजीत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. पत्नी आणि भावजयीनेच सुरजीत याच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी सुरजीत याची पत्नी विमला आणि भवजयी संगीता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सुरजीत याला दारूचे वेसन असल्यामुळे त्यांनीच दोन लाखांमध्ये हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या