JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / मेहुणीसोबत होतं अफेअर; व्यक्तीने करोडोंची लॉटरी जिंकताच तीच जिवावर उठली, शेवटी भयानक घडलं

मेहुणीसोबत होतं अफेअर; व्यक्तीने करोडोंची लॉटरी जिंकताच तीच जिवावर उठली, शेवटी भयानक घडलं

जेफ्रीला याची कल्पना नव्हती की व्हिक्टोरिया त्याच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीलाही डेट करत आहे. नॅथॅनियल नावाच्या तिच्या प्रियकरालाही जेफ्रीच्या संपत्तीची कल्पना होती.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 16 एप्रिल : एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर समोरची व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही? हेदेखील त्याला कळत नाही. अनेकवेळा असं देखील घडतं, की या प्रेमात अशा प्रकारे फसवणूक होते, की समोरच्या व्यक्तीला त्याची चाहुलही लागत नाही आणि भयंकर काहीतरी घडतं. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला, जो लॉटरी जिंकल्यानंतर आनंदी होता. परंतु त्याला समोरून येणाऱ्या धोक्याची कल्पना नव्हती.

ही कहाणी जेफ्री डॅम्पियर नावाच्या व्यक्तीची आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण 1996 सालचं आहे. जेफ्री अमेरिकेतील इलिनॉयमध्ये राहत होता आणि त्याला एक अब्जाहून अधिकची लॉटरी लागली. मात्र याच लॉटरीने त्याचा जीव घेतला. जेफ्री डॅम्पियर नावाच्या व्यक्तीने 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 1 अब्ज 63 कोटींहून अधिकची लॉटरी जिंकली होती. लॉटरी जिंकल्यानंतर तो आपल्या पत्नीपासून वेगळा झाला आणि क्रिस्टल जॅक्सन नावाच्या महिलेसोबत फ्लोरिडाला गेला. जेफ्रीचं तिच्याशी आधीच लग्न झालं होतं. तोपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण जेव्हा जेफ्रीने क्रिस्टलची बहीण व्हिक्टोरियाला तिच्या वाईट काळात मदत केली, तेव्हा या दोघांमध्ये अफेअर सुरू झालं. जेफ्रीला याची कल्पना नव्हती की व्हिक्टोरिया त्याच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीलाही डेट करत आहे. नॅथॅनियल नावाच्या तिच्या प्रियकरालाही जेफ्रीच्या संपत्तीची कल्पना होती. कार खराब झाल्याचं सांगत बहाण्याने व्हिक्टोरियाने जेफ्रीला बोलावलं आणि तिथे उपस्थित असलेल्या तिच्या प्रियकराने बंदुकीच्या जोरावर त्याचं अपहरण केलं. सगळे पैसे ट्रान्सफर करण्याचं सांगत त्याच्यावर अत्याचार केला. मात्र जेव्हा त्याने असं करण्यास नकार दिला तेव्हा नॅथॅनियलने व्हिक्टोरियाला जेफ्रीला गोळ्या घालायला सांगितलं. अखेर दोघंही पकडले गेले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शिक्षा देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या