नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : श्रध्दा वालकर हत्याकांडात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आरोपी आफताबच्या सांगण्यावरुन या संपूर्ण घटनेचा खुलासा करण्यासाठी पोलीस कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून जंगलापर्यंत सगळीकडे पोहोचत आहेत. तर याचवेळी घटनेतील आरोपी आफताबबाबतही रोज नवनवे खुलासे होत आहेत.. आता आफताबचा बालपणीचा मित्र निशंक मोदी याने आफताबबद्दल काही खुलासे केले आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांड; पोलिसांच्या हाती लागलं महत्त्वाचं CCTV फुटेज, आफताबचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद आजतकसोबत बोलताना निशंकने ही माहिती दिली आहे. निशंक म्हणाला की, आफताब असा गुन्हा करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. निशंकने सांगितलं की, मी आफताबला 15 वर्षांपासून ओळखतो. आफताब आणि मी शाळेतून आल्यानंतर बाहेर खेळायला जायचो. तो (आफताब) चांगल्या स्वभावाचा होता आणि त्याला कधीही रागाबाबतची काही समस्या नव्हती. त्याने सांगितलं की, आफताब 2019 पासून घराबाहेर पडला होता आणि तेव्हापासून वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागला होता. निशंकच्या म्हणण्यानुसार, आफताबचे कुटुंबीयही काही काळापूर्वी घर सोडून दुसरीकडे गेले होते. त्याच्या कुटुंबीयांनी कामानिमित्त दुसरीकडे जात असल्याचं यावेळी सांगितलं होतं. श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताबच्या कुटुंबीयांनी घर भाड्याने देणार असल्याचं सांगितलं होतं. निशंकने सांगितलं की, आफताब अभ्यासात चांगला होता. आफताबने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता आणि कॉल सेंटरमध्ये काम केलं होतं. मी ऐकले आहे की, श्रद्धा त्याच्या घरी यायची आणि जायची पण मी तिला कधी पाहिलं नव्हतं, असंही त्याने सांगितलं. . निशंकने या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत आफताबचा अशा गुन्ह्यात सहभाग असेल असं कुणालाही वाटलं नसेल असं सांगितलं. श्रद्धाच्या हत्येप्रकरणी आफताबला अटक केल्यानंतर दिल्ली पोलीस त्याची सतत चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या सांगण्यावरून काही हाडेही जप्त केली आहेत, जी फॉरेन्सिक तपासणीत मानवी हाडे असल्याची पुष्टी झाली आहे.