इंदौर क्राईम न्यूज
इंदौर : बऱ्याचदा पाहिलं असेल की ऑनलाईन प्रेम महागात पडतं. बऱ्याचदा माहिती लपवली जाते आणि फसवणुकीचे बळी महिला पडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नार्कोटिक्स विभागात नोकरी करत असल्याचं सांगून एक तरुणाने अनेक महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. भयंकर प्रकार म्हणजे या तरुणाने एक दोन नाही तर तब्बल 7 महिलांशी लग्नही केलं आहे. हा तरुण तीन मुलांचा बाप असल्याची देखील माहिती मिळाली आहे. तीन महिलांशी त्याने घटस्फोट घेतला तर दोघींनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला आहे.
मेव्हणीशी लग्न केला अन् बेघर झाला, सासरही गेलं अन् माहेरही गेलं नेमकं झालं काय?हा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना फूस लावायचा अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फसवणूक झालेल्या महिलांमध्ये चांगल्या सरकारी पदांवर काम करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. या आरोपीने तिच्याशी लग्न करून त्यांचे पैसे वापरले, त्याचा उपभोग घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या महिलेसोबत त्याने विवाह केला. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या डेप्युटी रेंजर अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या पतीचे नाव इंद्रनाथ आहे. त्याने अंमली पदार्थ विभागाचे बनावट ओळखपत्र तयार केलं. इंद्रनाथने डेप्युटी रेंजरची पत्नी अनिता यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. पत्नीच्या नावावर गाडी घेतली आणि स्वतः ठेवली. पत्नी अनिताला त्याचे हप्ते जमा करायचे आहेत. अनिता यांनी पोलिसांना सांगितले की, आरोपीने त्याची ओळख रोहित लाक्रा म्हणून केली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याची इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली. मग तो मेसेज करू लागला. स्वत:ला केंद्र सरकारचे अधिकारी असल्याचं सांगून त्याने मैत्री वाढवली. तो अनिताला सांगू लागला की तो छत्तीसगड राज्याचा कर्मचारी आहे, आपलं चांगलं होईल.
रात्रीच्या वेळी तरुणीला लिफ्ट दिली, चालत्या कारमध्ये बलात्कार केला अन् घडलं भयानकआरोपीने एक दिवस अनिता यांना रायपूरमध्ये भेटायला बोलावलं. 2021 मध्ये ती एका हॉटेलवर थांबली, दोघांनी आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केलं. पीडितेने कुटुंबीयांना भेटण्याबाबत सांगितलं तर आरोपीने टाळाटाळ केली. सुरुवातीला अनिता यांनी इंद्रनाथावर संशय घेतला नाही. पोस्टिंगवर असल्याचे सांगून त्याने बाहेर राहायला सुरुवात केली आणि हळूहळू पैसे उकळले. एके दिवशी इंद्रनाथ एका बाईशी बोलत होता. याचा अनिता यांना संशय आला. अनिता यांनी त्याला पकडल्यावर तो मित्र असल्याचे सांगू लागला. यानंतर अनिताने इंद्रनाथशी संबंधित मुलींना इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली.
13 वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केल अन्, सगळेच हादरलेत्या मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने आधीच या महिलांशी लग्न केल्याचं सत्य समोर आलं. त्यांनी आरोपीची हळूहळू सोशल मीडियावरून माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा काही महिला अशा समोर आल्या ज्यांचं लैंगिक शोषणही झालं होतं. त्यानंतर आरोपीच्या कार्डची सत्यता त्यांनी पडताळली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
हा व्यक्ती फ्रॉड असल्याचं समोर आलं. या महिलेचे पैसे देखील गेले आणि मनस्ताप झाला तो वेगळा. इंदौर इथे ही धक्कादायक घटना घडली असून तिथे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.