बिहारमध्ये एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. मोठ्या बहिणीशी लग्न ठरलेलं असताना मेहुणीने लग्नात राडा घालून तरुणाशी जबरदस्तीने लग्न केले. परंतु ज्या मुलीशी लग्न केले आहे ती मुलगी दिव्यांग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुलीच्या आई-वडिलांनी लग्नात मिळालेल्या भेटवस्तू न दिल्याने मुलाच्या कुटुंबीयांनी नवविवाहित जोडप्याला घरातून हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नवविवाहित जोडपे मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
नवविवाहित दाम्पत्य पुतुल आणि राजेश यांनी पोलिसांकडे मदतीची याचना केली, मात्र पोलिसांनी याप्रकरणी अद्यापर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही. पुतुलने आपल्याच वडिलांवर याबाबत आरोप केला आहे. तीला अपंगत्वामुळे त्याला लग्नात अडचण येत होती. त्यामुळे वडील माझ्याबाबतीत चुकीच्या पद्धतीने वागत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
बहिणीच्या लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या वराला आपल्या मेहुणीशी लग्न करावे लागले होते. बिहारच्या छपरा जिल्ह्यात 2 मे रोजी ही घटना घडली होती. यामध्ये लग्नात मेहुणीने जोरदार राडा घातल्याने गोंधळ उडाला होता यानंतर पोलीस आणि पंचायतीच्या मध्यस्थीने लग्न लावून देण्यात आले होते.
सध्या लग्नानंतर नवविवाहित जोडपे रस्त्यावर फिरत असल्याने वधूच्या सासरच्यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले आहे. आता तिचे लग्न झाले असून ती पतीसोबत राहणार असल्याचे पुतुलने म्हटले आहे. पण तिला लग्नात मिळालेल्या वस्तू परत हव्या आहेत, यासाठी ती लढत असल्याची सांगितले.