JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला; एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या

लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला; एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून : ‘राग हा माणसाचा शत्रू आहे’, अशी शिकवण शाळेत असताना मिळालेली असते. रागात असलेली व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा विचार करू शकत नाही. त्यामुळे रागाच्या भरात तिच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. काही वेळा तर रागाच्या भरात त्या व्यक्तीच्या हातून एखादा गंभीर गुन्हादेखील घडून जातो. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. हे प्रकरण इतकं भयंकर आहे, की संपूर्ण मैनपुरी जिल्ह्यात खळबळ उडाली असून एसपी, आयजी आणि एडीजीसह अनेक प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण?  मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरी जिल्ह्यातल्या किशनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोकुळपूर परिसरात एकाच कुटुंबातल्या एकूण पाच व्यक्तींचा खून झाला आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे हे खून याच कुटुंबातल्या मोठ्या मुलाने केले आहेत. मृत पाच जणांसह आरोपीने आणखी दोन स्त्रियांना मारण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. गोकुळपूर येथे राहणाऱ्या सुभाषचंद्र यादव यांच्या धाकट्या मुलाचा लग्नसोहळा असल्याने त्यांच्याकडे अनेक नातेवाईक जमा झालेले होते. शुक्रवारी (23 जून) रोजी हा विवाहसोहळा पार पडल्यानंतर यादव यांच्या घरी रात्री वरात आली. त्यानंतर थकलेले सर्व जण झोपी गेले. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास यादव यांचा मोठा मुलगा सोहवीरने आपले दोन भाऊ आणि भावाची पत्नी, मित्र आणि मेव्हण्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. खून झालेल्या व्यक्तींमध्ये नवदाम्पत्याचाही समावेश आहे, असं ‘जागरण’च्या वृत्तात म्हटलं आहे. याशिवाय, त्याने आपली मामी आणि पत्नीलाही मारण्याचा प्रयत्न केला व स्वत:वरही गोळी झाडली. या घटनेत आरोपी सोहवीरचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोहवीरची मामी आणि पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री अंगणात झोपले; सकाळी कोणाचे डोके फुटले तर कोणाचे हात, पाय तुटले, बुलडाण्यातील ‘त्या’ प्रकारानं खळबळ या घटनेची माहिती मिळताच किशनी पोलीस स्टेशनचे प्रभारी फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ एसपी, आयजी आणि एडीजीसह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस घरात उपस्थित असलेल्या इतर नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करत आहेत. या तरुणाने हे पाऊल का उचललं, याचा तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या