भयंकर ! पती-पत्नीचा वाद अन् मुलीचा झाला घात, रागात नराधम बापाने 1 वर्षीय मुलीला जिवंत पुरले
वाशिम, 12 मार्च : पती-पत्नीच्या वादातून (husband wife clash) निर्दयी बापाने आपल्या एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरून (man buried one year old daughter alive) तिची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील (Risod taluka Washim) वाडी वाकद शेतशिवारात ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील सुरेश घुगे हा आपली पत्नी कावेरी घुगे सोबत शेतात राहत होता. या दोघांना तीन मुली असून सुरेश घुगे हा नेहमी पत्नी कावेरी घुगे हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करायचा. शुक्रवारी रात्री सुरेश घुगे हा दारू पिऊन आला आणि त्याने पत्नी कावेरी घुगे हिच्यासोबत खुसपट काढत भांडण करु लागला. वाचा : लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीचा भयंकर भूतकाळ आला समोर; नवरदेवाने मोडला संसार! दोघा पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि वाद विकोपाला गेला. या भांडणात सुरेश घुगे याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. पतीचा राक्षसी अवतार पाहून पत्नी कावेरी घुगे ही आपला जीव वाचवण्यासाठी वाडी वाकद गावात नातेवाईकांकडे गेली होती. दरम्यान सुरेश घुगे याने आपला अनावर झालेला राग 1 वर्षीय लक्ष्मी घुगे या मुलीवर काढला. त्याने शेतात एक खड्डा खोदला आणि त्या खड्डयात लक्ष्मी घुगे या आपल्या एक वर्षाच्या जिवंत मुलीला शेतातील खड्ड्यात पुरत तिची हत्या केली. गावातील नातेवाईक आणि काही ग्रामस्थ शेताकडे गेले असता त्यांना चिमुकली दिसली नाही. तेव्हा त्यांनी सुरेश घुगे याला विचारणा केली असता त्याने मुलीला जिवंत खड्डयात पुरल्याचं सांगितलं. वाचा : मुंबईत नराधमानं चिमुकलीला दिल्या नरक यातना, सलग 5 दिवस सुरू होता भयावह प्रकार त्यानंतर ग्रामस्थांनी लगेच पुरलेला खड्डा उकरून लक्ष्मी घुगे हिला बाहेर काढलं मात्र, तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती नातेवाईकांनी रिसोड पोलिसांनी दिल्यावर रिसोड पोलीस स्टेशनचे अधिकारी देवेंद्रसिंह ठाकूर हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून, काढलेले प्रेत तपासणीसाठी पाठविले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी निर्दयी बाप सुरेश घुगे यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत असल्यानं महिलांमध्ये असुरक्षेचं वातावरण निर्माण झालं आहे.