मुंबई, 11 मार्च: मुंबईत (Mumbai) एका 25 वर्षीय युवकानं घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अमानुषतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला घरी एकटं असल्याचं पाहून तिच्यावर डाव साधला आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून (Lure of chocolate) तिच्यावर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार (Rape on minor girl) केले आहेत. अखेर पीडित मुलीच्या गुप्तांगात वेदना होऊ लागल्यानं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 25 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुंबईतील एकाच परिसरातील रहिवासी आहेत. पीडित मुलीचे वडील मासेमारी करतात त्यामुळे ते फार कमी वेळा घरी असतात. तर पीडितेची आई देखील घरकाम करते. त्यामुळे बहुतांशी वेळी पीडित मुलगी घरी एकटी राहते.
हेही वाचा-भरचौकात महिलेसोबत अश्लील कृत्य, पुण्यात IT इंजिनिअरला नागरिकांनी घडवली अद्दल
नराधम आरोपी हा बेरोजगार असून तो काहीच काम करत नाही. दरम्यान, 6 वर्षीय पीडित मुलगी घरी एकटी असल्याचं आरोपीनं हेरलं होतं. या परिस्थितीचा फायदा घेत आरोपीनं 1 मार्च रोजी पीडित चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून स्वतःच्या घरी घेऊन गेला. याठिकाणी त्यानं पीडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशाच प्रकारे आरोपीने सलग पाच दिवस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
हेही वाचा-भाड्यानं रूम मागायला आले अन् घरात घुसले,औरंगाबादेत महिलेसोबत घडला विचित्र प्रकार
दरम्यान पीडित मुलीच्या गुप्तांगात वेदना होऊ लागल्यानं तिने याची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर पीडितेच्या आईनं मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईनं मुंबई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्ह दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.