जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीचा भयंकर भूतकाळ आला समोर; Mobile पाहताच नवरदेवाने मोडला संसार!

लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीचा भयंकर भूतकाळ आला समोर; Mobile पाहताच नवरदेवाने मोडला संसार!

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

या सर्व प्रकारामुळे नवरीला जबर धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पलवल, 11 मार्च : हरयाणाच्या पलवलमध्ये तरुणीसोबत दुष्कृत्य झाल्याचा एका व्हिडीओ (Raped Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पतीला पाठवून मुलीचं (Break Marriage) आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं. या सर्व प्रकारानंतर पीडितेने पोलिसात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर 3 महिलांसह 5 जणांविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. पोलीस तपास अधिकारी सुमित्रा यांनी सांगितलं की, एका नवविवाहितेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, 6 मार्च रोजी तिचं लग्न फरीदाबाद येथील एका तरुणासोबत झालं होतं. सचिन नावाच्या तरुणाने तिच्यासोबत दुष्कृत्य करीत असताना शूट केलेला व्हिडीओ लग्नाच्या रात्री या  पतीला पाठवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर पतीने तिच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि नाराज झालेला तरुण पत्नीला तिच्या माहेरी सोडून आला. हे ही वाचा- चहाच्या दुकानात काम करणारा निघाला कोट्यधीश; बँक खात्यातून 5 कोटींचा व्यवहार ऑक्टोबरमध्ये झाला होता बलात्कार… पीडितेचा आरोप आहे की, ऑक्टोबर 2021 मध्ये ती आपल्या काकांच्या घरी एकटी होती. त्यादरम्यान सचिन अन्य दोन तरुणांना घेऊन त्यांच्या घरात घुसले. यानंतर तरुणीने आरडाओरडा सुरू केला. आरोपीने तिचं तोंड कपड्याने बांधलं आणि आतल्या खोलीत नेत चाकू दाखवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करीत असताना अन्य तरुणाने अश्लील व्हिडीओ शूट केला आणि कोणालाही सांगितलं तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे तरुणी घाबरली. आरोपी तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करीत होता. मात्र तरुणीचं लग्न दुसरीकडे झाल्यामुळे आरोपीने तिच्या पतीला हा व्हिडीओ पाठवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर पतीने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. पतीने तरुणीसोबत कोणतंही नातं ठेवण्यास नकार दिला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: marriage , Rape
  • First Published :
जाहिरात
जाहिरात