JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / मुलीला एकटं सोडून बँकेत गेले आई-वडील; घरी येऊन पाहिलं तेव्हा सरकली पायाखालची जमीन

मुलीला एकटं सोडून बँकेत गेले आई-वडील; घरी येऊन पाहिलं तेव्हा सरकली पायाखालची जमीन

एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्याचा विचार कोणत्याच आई वडीलांनी केला नसावा.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 24 जून : कधी-कधी आईवडिल आपल्या मुलांना काही कामासाठी घरी एकट्यांनो सोडून जातात. अशावेळी कधी काही तासांसाठी तर कधी काही दिवसांसाठी मुलं एकटीच घरी असतात. अशावेळी आपल्या मागे आपल्या मुलांची काळजी आई वडीलांना असते, पण यासंबंधी एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्याचा विचार कोणत्याच आई वडीलांनी केला नसावा. हा संपूर्ण प्रकार यूपीमधील बांदा येथील आहे. खरौच गावातील माजरा संतराम येथील रहिवासी धीरेंद्र वर्मा यांची 14 वर्षीय मुलगी कुमारी राखी ही नववीत शिकत होती. शुक्रवारी सकाळी धीरेंद्र पत्नी रूपासोबत इंडियन बँक कॉलनीत हप्ता काढण्यासाठी गेले होते. तेथे गर्दीमुळे त्यांना उशीर झाला आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास जेव्हा ते घरी परतले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि परिसरात एकच शांतता पसरली. डॉक्टरांची एक चुक आणि वडिलांनी डोळ्यासमोर पाहिला आपल्या नवजात बाळाचा मृत्यू खरंतर या 14 वर्षीय मुलीने आपले आईवडील गेल्यानंतर घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीचा मृतदेह पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी तपास केला असता खोलीत एका कागदावर लिहिलेली सुसाईड नोट सापडली. का बहुतांश किन्नर धर्म बदलून स्वीकारतात इस्लाम? या मागचं कारण लपलंय इतिहासात या नोटमध्ये लिहिले होते की, “आता मी राहणार नाही आणि कोणालाही काही माहिती पडणार नाही. मी कोणामुळेही माझं जिवन संपवत नाहीय, मला माफ कर मम्मी.’’ मात्र, पोलिस या घटनेकडे संशयाने पाहत आहेत. पीएम रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

वडील धीरेंद्र वर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या एका मुलाचे आधीच निधन झाले आहे. ती त्यांची लाडकी होती. ती विवेकानंद इंटर कॉलेजची विद्यार्थी होती. आता त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीला देखील गमावलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या