प्रतिकात्मक फोटो
झारखंड : आजकाल अनेक शाळांमध्ये नियम कडक करण्यात आले आहेत. वेण्या किंवा छोटे केस ठेवायचे, नख वाढवायची नाहीत किंवा कपाळावर टिकलीही नाही. कपाळावर टिकली लावून आल्याने चक्क शिक्षिकेनं दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला भयंकर शिक्षा केली. हा छळ सहन करु न शकल्याने अखेर या विद्यार्थिनीने आपलं आयुष्य संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार, मृत झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील हनुमानगढ़ी तेतुलमारी इथे ही घटना घडली. तेतुलमारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये ही विद्यार्थिनी दहावीत शिकत होती. सोमवारी पुष्पा टिकली लावून शाळेत गेली आणि त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.
पुष्पा टिकली लावून आल्याने सकाळच्या प्रार्थनेवेळी शिक्षिका संतापल्या. पुष्पा टिकली लावून का आली याचा जाब तिला विचारला. विद्यार्थिनीने दिलेल्या उत्तराने शिक्षिक संतापले, त्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. यामुळे विद्यार्थिनीला दुखापत झाली आणि तिने घरी आल्यानंतर गळफास लावून घेतला. ती शाळेच्या गणवेशात होती. त्याच्याकडून सुसाईड नोटही सापडली असून त्यात शिक्षकाला मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
डॉक्टर असल्याचं सांगून 35 वर्षीय युवकाने केली 15 लग्नं, शेवटी पितळ उघड होताच अजब कारण समोरसंपूर्ण शाळेसमोर मला मारहाण करण्यात आली. मला शाळेतून काढून टाकलं आहे. माझी झालेली बदनामी मी सहन करु शकत नाही त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या या निर्णयाला केवळ शाळेतील सिंधू मॅडम जबाबदार आहेत असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. सिंधू मॅडमवर कारवाई करावी असं पुढे ती म्हणाली आहे. नातेवाईक आणि सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी शाळेतील शिक्षिकेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.