जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / झोपलेल्या तरुणीवर फेकलं अ‍ॅसिड, लग्न मोडल्याने नाराज होता तरुण, संतापजनक घटना

झोपलेल्या तरुणीवर फेकलं अ‍ॅसिड, लग्न मोडल्याने नाराज होता तरुण, संतापजनक घटना

घटनास्थळाचा फोटो

घटनास्थळाचा फोटो

या घटनेने संपूर्ण परिसरच हादरला आहे.

  • -MIN READ Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
  • Last Updated :

कृष्ण बहादुर शुक्ला, प्रतिनिधी अयोध्या, 12 जुलै : उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याने तरुणाने एका तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अ‍ॅसिड हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तेथून डॉक्टरांनी तिला लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले. काय आहे संपूर्ण प्रकरण - घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला रात्रीच गावाच्या बाहेरुन अटक केली. ही घटना हैदरगंज येथे घडली. याप्रकरणी एसएसपी राजकरण नैयर यांनी घटनास्थळी आल्यावर नातेवाईकांशी याप्रकरणी चौकशी केली.

News18लोकमत
News18लोकमत

मिळालेल्या माहितीनुसार, राजकरण शर्मा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तरुणीचे लग्न आरोपी तरुणासोबत निश्चित झाले होते. त्यानंतर काही कारणांनी हे लग्न मोडले. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने रात्री दीड वाजेच्या सुमारास मुलीच्या घरी पोहोचून तरुणीवर केमिकल टाकले. त्यामुळे तरुणी गंभीर भाजली. तरुणीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी आवाज उठवला आणि तरुणीला रुग्णालयात नेले. इथे तिची गंभीर प्रकृती पाहता वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचारानंतर तिला ट्रॉमा सेंटरला लखनौला रेफर करण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी पहाटे एक वाजता घडली. त्यांना त्यांच्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर संपूर्ण कुटुंब तेथे पोहोचले. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे मुलगी वाईटरित्या किंचाळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर आम्ही पोलिसांना माहिती दिली, तर 6 महिन्यांपूर्वीही आरोपी रात्रीच्या वेळी घरात घुसला होता. त्यावेळी, आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते, असे त्यांनी सांगितले. एसएसपी राजकरण नय्यर यांनी सांगितले की, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणातील पुरावे गोळा करण्याच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसांत दोषारोपपत्र माननीय न्यायालयात पाठवून या प्रकरणाचा जलदगती खटला चालविला जाईल, असे सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात