JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / क्रिकेटच्या मैदानावर जीवाचा खेळ झाला, कॅनडाहून आलेल्या तरुणासोबत वाईट घडलं

क्रिकेटच्या मैदानावर जीवाचा खेळ झाला, कॅनडाहून आलेल्या तरुणासोबत वाईट घडलं

राजस्थानच्या राजकोटमध्ये महिन्याभरात चार तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजकोट, 19 फेब्रुवारी : राजस्थानच्या राजकोटमध्ये महिन्याभरात चार तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मागच्या तीन दिवसांपूर्वी पुन्हा एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ज्यामध्ये तो आपल्या भाच्याच्या लग्नासाठी डीसा येथे बहिणीच्या घरी आला होता आणि मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. मात्र दुर्दैवाने तो तरुण बहिणीच्या घरी परतू शकला नाही. घरी परतत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

राजस्थानच्या रेसकोर्स परिसरातील माधवराव सिंधिया मैदानावर क्रिकेट खेळत असताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. क्रिकेट खेळत असताना जिग्नेश चौहान नावाच्या तरुणाला अटॅक आला. दरम्यान जिग्नेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले राजकोटमध्ये मागच्या 20 दिवसांतील ही चौथी घटना आहे.

हे ही वाचा :  प्रियकर बोलत नाही म्हणून तरुणीचं धक्कादायक कृत्य, आधी आईच्या छातीवर बसली अन् नंतर.., घटनेनं औरंगाबादेत खळबळ

संबंधित बातम्या

दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली आहे. मूळचा डीसाचा रहिवासी असलेला 40 वर्षीय भरत बरैया राजकोटला त्याच्या चुलत भावाच्या घरी लग्नासाठी आला होता. तेव्हा क्रिकेट खेळून घरी परतत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. बुधवारी सकाळी तो राजकोटच्या शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर खेळण्यासाठी गेला होता.

नंतर घरी परतत असताना वाटेत त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांच्या मित्रांनी 108 ला फोन करत रुग्णवाहिका बोलवली. त्यानंतर लगेच 108 या रुग्णवाहिकेतील टीमने प्रयत्न केला परंतु भरत बरैया यांना वाचवण्यात अपयश आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून भरतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला.

जाहिरात

हे ही वाचा :  आता बागेश्वर धाममधून शिक्षक बेपत्ता; धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी घरातून निघाला अन्…

दरम्यान त्याला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो वाचू शकला नाही. दरम्यान भरतच्या कुटुंबात याबाबत माहिती समजताच शोककळा पसरली. दरम्यान भरतच्या सासूबाईंनी स्ट्रेचरवर मिठी मारून हंबरडा फोडला.

सुरतमध्येही असाच प्रकार

दरम्यान कॅनडात इंजिनीयरींगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला सुरतमध्ये क्रिकेट खेळल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. मृत प्रशात बरोलिया क्रिकेट खेळून घरी आला होता यावेळी अचानक प्रशांतला घरीच झटका आला.  सुरतच्या वराछा भागातील ही घटना आहे.  

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या