पुणे, 22 जून : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसात वनविभागात रुजू होणाऱ्या दर्शना पवार हिच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. या घटनेबाबत महत्त्वाच्या अपेडट समोर आल्या आहेत. दर्शना आपल्या मित्रासोबत 12 जून रोजी राजगडावर गेली होती. त्यानंतर दर्शनाचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 18 जून रोजी राजगडावर एक तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळता. अधिक तपास केला असतो तो मृतदेह दर्शना पवार हिचा असल्याचं समोर आलं. दरम्यान दर्शनासोबत तिचा मित्र राहुल हंडोरेही सोबत गेला होता. राजगडावर गेल्यानंतर काही वेळाने तो एकटाच गड उतरल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आलं होतं. त्यामुळे राहुलवर संशय व्यक्त केला जात होता. MPSC उत्तीर्ण..सत्कार अन् हत्या मृत तरुणीचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना ही 9 जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत (आर, एफ, ओ) विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झालेबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी 10 तारखेपर्यंत 4 वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने आमचे फोन उचलले नाही म्हणून मी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याचे बरोबर सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेली असल्याचे कळाले. दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत.. गावातील काही नागरिक त्या भागाकडे गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. याची तातडीने माहिती त्या युवकांनी गावातील प्रमुख लोकांना दिली. त्यांनी लागलीच वेल्हे पोलिसांना कळवून घटनास्थळी धाव घेतली, मृत देहाचे वर्णन संबधीत कुटुंबातील लोकांना सांगितले त्या आधारे मृत देहाची ओळख पटविण्यात आली. दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर, मित्र राहुलला अटक दर्शनाची हत्या करून राहुल परराज्यात फरार.. राहुल हांडोरे हा मुळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाहवाडी गावाचा आहे. त्याने BSCचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तो पुण्यात MPSC ची तयारी करत होता. दर्शना आणि राहुलची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दोघेही एकमेकांच्या चांगल्या संपर्कात होते. 9 तारखेला हे दोघं ट्रेकिंगला राजगडावर गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी दोघांचे फोन बंद लागले. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांकडून 12 जूनला पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. राहुलनेच केलं ब्रेकअप पण दर्शना उत्तीर्ण झाली अन्.. दर्शना आणि राहूल हे एकमेकांचे नातेवाईक होते. तसंच गेल्या दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र परीक्षेपूर्वी राहुलनेच ब्रेकअप केलं होतं. पण ती अधिकारी झाल्यावर राहुल पुन्हा लग्नासाठी मागे लागला होता. दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. दोघेही एम पी एस सी ची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. Darshana Pawar : दर्शनाचा मृत्यू नेमका कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा, धक्कादायक माहिती समोर नातेवाईकांनी दर्शनाचं लग्न ठरवलं, राहुलचं प्लानिंग झालं सुरू.. दरम्यान, दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.