जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर, राहुलच्या अटकेनंतर खुलासा

Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर, राहुलच्या अटकेनंतर खुलासा

दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुलला अटक

दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुलला अटक

Darshana Pawar : एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवारची वनअधिकारी पदी निवड झाली होती. दर्शनाच्या हत्येचं कारण आता समोर आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनवणे, पुणे, 22 जून :  दर्शना पवारच्या हत्या प्रकरणी तिचा मित्र राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दर्शनाच्या हत्येनंतर राहुल वेगवेगळ्या राज्यात गेला होता. पुण्यातून फिरायला गेल्यावर राजगडाच्या पाथ्याशी त्याने दर्शनाची हत्या केली असल्याचं आता समोर आलं आहे. एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवार ची वनअधिकारी पदी निवड झाली होती. दर्शनाच्या हत्येचं कारण आता समोर आलं आहे. दर्शना आणि राहूल हे एकमेकांचे नातेवाईक होते. तसंच गेल्या दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र परीक्षेपूर्वी राहुलनेच ब्रेकअप केलं होतं. पण ती अधिकारी झाल्यावर राहुल पुन्हा लग्नासाठी मागे लागला होता. दर्शना सोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. दोघेही एम पी एस सी ची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. मोठी बातमी! दर्शना पवारच्या हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक   दरम्यान, दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या.  त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले.  मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

News18लोकमत
News18लोकमत

वडील दत्तू दिनकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना ही 9 जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत (आरएफओ) विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने आमचे फोन उचलले नाहीत म्हणून मी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्या बरोबर सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेली असल्याचे कळाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात