दर्शना पवार
पुणे, 20 जून : MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि वन विभागात रुजू झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला होता. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. दर्शना आपल्या मित्रासोबत 12 जून रोजी राजगडावर गेली होती. याच दिवशी ती शेवटचं तिच्या बाबांशी बोलली. त्यानंतर तिचा कोणाशीच संपर्क झाला नाही. 9 जूनला आली होती पुण्यात तिचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी तक्रार केली होती, शेवटी 18 जून रोजी राजगडावर तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत तरुणीचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना ही 9 जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत (आरएफओ) विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने आमचे फोन उचलले नाहीत म्हणून मी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्या बरोबर सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेली असल्याचे कळाले, अशी माहिती दर्शनाच्या वडिलांनी दिली.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दर्शनाचा तपास सुरू केला असता, तिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला होता. दरम्यान आता दर्शनाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहेत, यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांचा संशय हा दर्शनाचा मित्र राहुल याच्यावर आहे. तो देखील बेपत्ता असून, त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 पथकं तैनात केली आहेत.
Pune News : अपघात, घातपात की आणखी काही… राजगडच्या पायथ्याशी MPSC उत्तीर्ण तरुणीसोबत काय घडलं?काय आहे नेमकं प्रकरण? दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. या प्रकरणाची चौकशी केली असता CCTV फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत आहेत. मात्र नंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राहुल सध्या बेपत्ता आहे. राहुल नेमका कुठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाइलचं लोकेशन परराज्यात दिसत आहे.