JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पुणे हादरलं! माझ्याकडून पैसे घेते आणि इतर लोकांसोबत बोलते, संतापलेल्या प्रियकरानं उगवला सूड

पुणे हादरलं! माझ्याकडून पैसे घेते आणि इतर लोकांसोबत बोलते, संतापलेल्या प्रियकरानं उगवला सूड

पुण्यातील लोहगाव याठिकाणी एका शेतात महिलेचा मृतदेह (Dead body found in lohgaon) आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. विमानतळ पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत आरोपीला जेरबंद केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

येरवडा, 30 एप्रिल: पुण्यातील लोहगाव याठिकाणी एका शेतात महिलेचा मृतदेह (Dead body found in lohgaon) आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यानंतर हातात कोणतेही पुरावे नसताना तातडीनं पावलं उचलत विमानतळ पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत आरोपी युवकाला जेरबंद केलं आहे. संबंधित आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिली असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे. संबंधित 31 वर्षीय आरोपी युवकाचं नाव संतोष महादेव राठोड असून त्याचे संबंधित मृत महिलेशी प्रेमसंबंध (Love affair) होते. लोहगाव परिसरात राहणारा आरोपी सोमवारी रात्री आपल्या प्रेयसीकडे जेवणासाठी गेला होता. यावेळी जेवण झाल्यानंतर तो आपल्या प्रेयसीला घेऊन बाहेर फिरायला गेला. निर्जनस्थळी गेल्यानंतर त्याने संधी साधून प्रेयसीचा गळा दाबला. यामुळे प्रेयसी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी प्रियकराने तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर आरोपी संतोष राठोड याचे मागील काही काळापासून मृत महिलेशी प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात आरोपीनं तिला अनेकदा पैशांची आणि इतर मदत केली होती. पण आपल्याकडून पैसे आणि इतर मदत घेऊन ती दुसऱ्या लोकांसोबतही बोलते. याचा राग आरोपी प्रियकराला होता. हाच राग मनात धरून त्यानं प्रेयसीची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. हे ही वाचा- नवरा-मुलांना सोडून प्रियकरासोबत पळाली महिला; पुढे असं काही घडलं तिला बसला धक्का सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर आरोपी युवक तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. जीवे मारण्याच्या हिशोबाने आलेल्या प्रियकराने तिचा सुरुवातीला गळा दाबला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने शेतातील दगडाने तिच्या डोक्यात वार केला. या दुर्दैवी हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला प्रियकराला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या