औरंगाबाद, 29 एप्रिल: प्रियकरासाठी पती आणि दोन मुलांना सोडणाऱ्या विवाहितेनं फसवणूक झाल्यामुळं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा (Married Woman Tried to Commit Suicide) प्रकार औरंबादेत घडला आहे. महिला आत्महत्या करण्यासाठी थेटे रेल्वे रुळावर पोहोचली होती. पण रेल्वे येण्याच्या आधीच पोलिसांच्या दामिनी पथकानं वेळीच पोहोचून ही आत्महत्या थांबवली. (Aurangabad crime news)
विवाहितेचा प्रयत्न करणारी महिला ही औरंगाबादच्या वाळूज परिसरात राहत होती. तिचा पती वाळूजमध्ये कामाला होता. या महिलेला आठ आणि चार वर्षांची अशी दोन मुलेही आहेत. पण महिला आणि तिच्या पतीमध्ये काही कौटुंबीक वाद सुरू आहेत. या वादाचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान या महिलेचे अजिंक्य नावाच्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. त्यामुळं प्रियकरासाठी या महिलेनं पती आणि मुलांना सोडण्याचा निर्णय घेतला.
(हे वाचा-पेपर विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअर झाला,घरून काम करत असताना कोरोनाची लागण झाली अन्)
काही दिवसांपूर्वी ही महिला पती आणि मुलांना सोडून प्रियकराकडे आली. पण प्रियकराने तिची फसवणूक केली. काही दिवसांतच त्यानं या महिलेला सोडून दिलं. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. घरी पती आणि मुलांना सोडून ती आली होती. त्यामुळं घरी जाण्याचा मार्गही आपल्यासाठी बंद आहे असं तिला वाटलं. त्यामुळं या महिलेनं आत्महत्येचा निर्णय घेतला.
(हे वाचा-पेपर विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअर झाला,घरून काम करत असताना कोरोनाची लागण झाली अन्)
आत्महत्या करण्यासाठी ही महिला औरंगाबादच्या शिवाजीनगर येथील रेल्वे रुळावर गेली होती. त्याठिकाणी एक महिला दोन तासांपासून रडत बसल्याची माहिती पोलिसांना नियंत्रण कक्षामार्फत समजली. त्यामुळं तत्काळ दामिनी पथकाला पाचारण करण्यात आलं. या पथकाली पोलिस कर्मचाऱ्यांनी तिची समजूत काढली आणि तिला पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणीही तिचं समुपदेशन करून तिला पोलिसांनी मदत करण्याचं आश्वासनही दिलं. मुला बाळांनी भरलेला संसार सोडून प्रेमसाठी ही महिला सर्वकाही सोडून आली होती. त्यामुळंच फसवणूक झाल्यानं ती पुरती कोलमडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Crime news, Maharashtra, Suicide