Representative Image
पुणे, 29 एप्रिल : पुण्यातील शाळेत (Pune School) अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाविद्यालयातील शिपायाने एका विद्यार्थीनीकडे विचित्र मागणी केली आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. 12 वी पास व्हायचं का? असं विचारत एका विद्यार्थीनीकडे महाविद्यायातील शिपायाने (College peon) विचित्र मागणी केली. या प्रकरणी पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यावर आरोपी शिपायाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) अटक केली आहे. पिंपरी चिंचवडमधील नावाजलेल्या महाविद्यालयात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने फ्लाईंग वूमन फाऊंडेशनकडे तक्रार केली. त्यानंतर ही तक्रार पोलिसांकडे गेली आणि मग पोलिसांनी आरोपी शिपायाला अटक केली. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आरोपीने आणखी कुठल्या विद्यार्थीनींच शोषण केलं का? याचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे. वाचा : 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, परळीतल्या घटनेने बीड जिल्हा हादरला आरोपी विनोद याने पीडित विद्यार्थीनीला फोन केला. यावेळी त्याने त्या मुलीला म्हटलं, 12वी पास व्हयचं आहे ना? त्यावर पीडित मुलगी हो म्हणाली. त्यावर आरोपीने मुलीला म्हटलं, तुझी एक फ्रेंड असल तर तिला विचार अंकल ला काय दिला का नाही ते ? मला तू पाहिजे, तू. या घटनेनंतर पीडित मुलीने न घाबरता याबाबत तक्रार केली आणि आरोपी गजाआड झाला. चेन्नईत महाविद्यालयीन तरुणींमध्ये भयंकर भांडण चेन्नईमध्ये बस स्टॉपवर दोन कॉलेजच्या दोन विद्यार्थीनींमध्ये प्रचंड वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांच्यात थेट हाणामारी सुरू झाली. पुढे ही भांडणं इतकी टोकाला गेली की या तरुणीला एकमेकींना जमिनीवर पाडून मारू लागल्या. यासोबतच नंतर इतर अनेक मुलीही या भांडणात सामील झाल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलींमधील मारहाणीची ही घटना 26 एप्रिलची (मंगळवार) आहे. उत्तर चेन्नईतील न्यू वॉशरमनपेट येथील बसस्थानकावर महाविद्यालयीन मुली बसची वाट पाहत होत्या. यादरम्यान दोन मुलींमध्ये वाद झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बसस्थानकावरच या वादाचं हाणामारीत रुपांतर झालं. विद्यार्थिनींचे गट आपसात भिडल्याचं याठिकाणी पाहायला मिळालं.