Home /News /maharashtra /

Beed crime news: 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, परळीतल्या घटनेने बीड जिल्हा हादरला

Beed crime news: 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, परळीतल्या घटनेने बीड जिल्हा हादरला

Representative Image

Representative Image

Maharashtra crime news: बीड जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

बीड, 28 एप्रिल : शेतात काम करणाऱ्या एका विहवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangraped) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed district) परळी (Parali) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घरालगात असलेल्या शेतात सामूहिक बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (22 year old woman gangraped in Beed) शेतात एकटी पाहून.... 22 वर्षीय पीडित महिला ही शेतालगत असलेल्या आपल्या कुटुंबासोबत राहते. पीडिता आपल्या शेतातील घरालगत शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे (वय 40 वर्षे) साजन तिडके (वय 30 वर्षे) या आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार करुन धमकावले सामूहिक बलात्कार केल्यावर आरोपींनी पीडितेला धमकावले. याबाबत कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात 376 (ड), 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाचा : घृणास्पद! 2 सख्ख्या बहिणींवर सात जणांचा सामूहिक बलात्कार, धाकटी राहिली गरोदर अन्... 3 तासांत आरोपी गजाआड सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल होताच पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावली आणि आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर अवघ्या 3 तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली. परळी ग्रामीण पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी सुद्धा समोर आली होती अशीच घटना एका 24 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (woman gangraped) झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली होती. 24 वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या एकाने, गुंगीचे ज्यूस देऊन अहमदनगर शहरात बलात्कार केला. तर दुसऱ्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे यावेळी तिघा नराधमांनी रात्रभर छेड काढली. नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Crime, Gang Rape, Maharashtra News

पुढील बातम्या