JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / कंपनीवर हवे होते पूर्ण नियंत्रण, सांताक्रूझ पतीच्या हत्येप्रकरणी आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

कंपनीवर हवे होते पूर्ण नियंत्रण, सांताक्रूझ पतीच्या हत्येप्रकरणी आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

सांताक्रुझ मधील पतीच्या हत्येप्रकरणी आरोपपत्रात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी : मागच्या काही दिवसांपूर्वी प्रियकराच्या मदतीने पतीचा हत्या केल्याची घटना मुंबईत घडली होती. दरम्यान या घटनेतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. सांताक्रूझमधील व्यापारी कमलकांत शहा आणि त्यांच्या आईच्या मृत्यूप्रकरणी सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात म्हटले आहे की, “हे दुहेरी हत्याकांडाचे प्रकरण आहे. त्याची पत्नी काजल शाहने तिच्या प्रियकराच्या मदतीने आई-मुलाची संपत्ती हडपण्याच्या उद्देशाने हळू हळू मारण्यासाठी आर्सेनिक आणि थॅलियमचा वापर केला. " एका अधिकाऱ्याने सांगितले की, “काही डीलर्सच्या मदतीने पंजाब आणि भायखळा येथून आणलेल्या आर्सेनिक आणि थॅलियमच्या मदतीने दोघांची हत्या झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.” मीड डे ने याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने सोमवारी काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन यांच्याविरुद्ध 2000 पानांचे आरोपपत्र दाखल केले. यात 75 साक्षीदारांचे जबाब आहेत. “काजल कमलकांत ही यांच्या गारमेंट कंपनीत त्याच्या आणि त्याच्या आईशिवाय तीन संचालकांपैकी एक होती. या दोघांची हत्या केल्यानंतर तिने कंपनीवर पूर्ण ताबा मिळवला. काजल आणि आरोपी हितेश जैन दोघेही जून आणि जुलैपासून विष खरेदी करत होते,” असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. . “कमलकांत* यांच्या आई सरला देवी यांना अन्नातून आर्सेनिक आणि थॅलियम देण्यात आले. त्यांना पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 13 ऑगस्ट 2022 रोजी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला”, असे आरोपपत्रात म्हटले आहे. रात्री 12 वा. मेसेज, प्रेयसीसोबत शरीरसंबंध; तेवढ्यात काकाचा फोन आला अन्… आरोपपत्रात पुढे असेही म्हटले आहे की, “सरला* यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही संशय नसल्यामुळे, आरोपींनी कमलकांतलाही संपवण्याचा कट रचला. त्यांनी भायखळा येथील एका व्यापाऱ्याकडून आर्सेनिक आणि पंजाबमधून थॅलियम आणले. आम्ही 164 CrPc अंतर्गत त्यांचे जबाब नोंदवले आहेत. तेथे साक्षीदार आणि फॉरेन्सिक अहवाल आहेत, ज्यामध्ये शहा आणि त्यांच्या आईचा मृत्यू स्लो पॉयझनिंगमुळे झाला होता, असे स्पष्ट होते”, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. क्राईम ब्रँचकडे मात्र सरला देवी यांच्या हत्येप्रकरणी कोणताही थेट पुरावा नाही, कारण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि मेटल टेस्ट्सबाबत कोणताही रक्त अहवाल नव्हता. मात्र, “ऑगस्टमध्येही आर्सेनिक मिळवण्यात आल्याचे साक्षीदार आणि पुरावे आहेत, जे सरला देवीला संपवण्यासाठी विष वापरण्यात आल्याची पुष्टी करतात.”, असेही तपास अधिकाऱ्याने म्हटले. मागच्या काही दिवसांपूर्वी प्रियकराच्यामदतीने पतीचा हत्या केल्याची घटना मुंबईत घडली होती. कमलकांत यांचा 19 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या घटनेतून धक्कादायक माहितीसमोर आली. आरोपी प्रियकर हा मृत व्यक्तीचा जुना मित्र असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्येचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी कट रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपास सुरू केला. दरम्यान यातून आता नवीन एक माहिती समोर आली आहे. या दोघांनी मिळून सासूचाही खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. सासूलाही त्यांनी अशाची पद्धतीने मारले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या