JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / फटाके फोडण्यावरुन झालेला वाद अन् मग दगडाने हाणामारी; जळगावातील घटनेत एकाचा मृत्यू, तिघे अटकेत

फटाके फोडण्यावरुन झालेला वाद अन् मग दगडाने हाणामारी; जळगावातील घटनेत एकाचा मृत्यू, तिघे अटकेत

शिरसोली नाका परिसरातील सदगुरू कॉलनीत फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. फटाके फोडण्यावरुन झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदुरकर, जळगाव 30 ऑक्टोबर : जळगावात घडलेल्या एका गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. फटाके फोडण्याच्या कारणावरून शिरसोली नाका येथे तरूणावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता एमआयडीसी पोलीसांनी फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना तांबापूर परिसरातून अटक केली आहे. शहरातील शिरसोली नाका परिसरातील सदगुरू कॉलनीत फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. यातूनच ही घटना घडली. पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार, पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकलं अन्… फटाके फोडण्यावरुन झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. त्यानंतर मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, सतकौर जगदीशसिंग बावरी, सोनुसिंग जगदीशसिंग बावरी यांनी वाद घातला. यात संतापाच्या भरात मोहनसिंग बावरी, मोनुसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी यांनी मिळून संजयसिंग प्रदीपसिंग टाक याच्या पोटावर चाकूने वार करून खून करत दगडफेक केली. खून झाल्यापासून संशयित आरोपी हे फरार झाले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन राबवून अटक केली. तांबापूरा परिसरातून ही अटक करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी या तिघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 4 वर्षांचं प्रेम, डोळ्यांवर पट्टी बांधून दिलं सरप्राईज; तरुणीने दुसऱ्यासाठी विषयच संपवला! भंडाऱ्यात प्रेयसीचा प्रियकरावर हल्ला - नुकतंच भंडाऱ्यातूनही एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली होती. यात प्रेमाच्या त्रिकोणात पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला सरप्राइज गिफ्ट आणल्याचे सांगत डोळ्यावर पट्टी बांधून प्रेयसीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला . ही घटना भंडारा तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडली. याप्रकरणी प्रेयसीसह एका तरुणावर जवाहरनगर ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या