प्रतिकात्मक फोटो
बांदा, 18 फेब्रुवारी : देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच कौटुंबिक वादातून हत्या आणि हत्येच्याही घटना घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने लग्नाला जाण्यापासून रोखल्याने संतापलेल्या पत्नीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. यानंतर पत्नीच्या आत्महत्येची बातमी पतीला मिळताच त्यानेही विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. काय आहे संपूर्ण प्रकरण - घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला लग्न समारंभाला जाण्याचा हट्ट करत होती. पतीने लग्नाला जाण्यास नकार दिल्याने तिने हा भयानक निर्णय घेतला. त्यानंतर पतीनेही विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या पतीवर बांदा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृत महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील बिसांडा पोलीस स्टेशन परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी आधी पत्नीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर पतीनेही विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाइकांनी या तरुणाला तातडीने बांदा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना सीओ बाबेरू राकेश सिंह यांनी सांगितले की, विनिता (21 वर्षे) आणि अजयचे 8 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. घरगुती कलहामुळे विनिताने बिसांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोर्ही येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हेही वाचा - लग्नाच्या 6 महिन्यातच पती-पत्नीमध्ये वाद, प्रकरण कोर्टात अन् घडलं भयानक मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पत्नीच्या आत्महत्येचे वृत्त समजताच अजयसुद्धा विषारी द्रव्य प्यायला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.