आदित्य कुमार (नोएडा), 25 मार्च : ग्रेटर नोएडामध्ये एका भटक्या कुत्र्याने दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्यांने जोरदार हल्ला केल्याने मुलीच्या शरिराचे अनेक लचके तोडल्याची माहिती समोर आली आहे. कुत्र्याने मुलीवर हल्ला करत तिला पकडून 50 मीटरपर्यंत ओढत नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान नोएडामध्ये अशा वारंवार होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
गौतम बुद्ध नगर नोएडा प्राधिकरणाच्या परिसरात अशा घटना वारंवार होतात. याचबरोबर तातडीने मुलांना शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे पुरेसी सुवीधा मिळत नसल्याचीही या भागातील नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.
धक्कादायक! अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर भंडाऱ्यात कुऱ्हाडीने हल्ला, वाहन पेटवण्याचा प्रयत्नदीड वर्षाची मुलगी घराच्या अंगणात खेळत होती. खेळता खेळता ती दारात आली, तेवढ्यात कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. मुलीची आई कृतिका चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक कुत्रा धावत आला आणि मुलगी निर्वाणीचा हात तोंडात धरून पळू लागली.
त्यानंतर माझे सासरे नरेश सिंह चौहान यांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला, त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने ते कुत्र्याच्या मागे धावू लागले. नरेश सिंह चौहान यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मी कुत्र्याच्या मागे धावलो तेव्हा तो मुलीला सोडून पळून गेला. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.
चौहान सांगतात की, या परिसरात नेहमी कुत्र्यांची दहशत आहे. या कुत्र्याने अनेकदा हल्ला केला आहे. अनेकवेळा तक्रार करूनही कोणी याची दखल घेत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. जेव्हा कुत्र्याने आमच्या बाळाचा चावा घेतला तेव्हा आम्ही तिला जवळच्या शारदा हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे कुत्रा चावल्यानंतर कोणतेही इंजेक्शन दिले गेले नाही.
त्यानंतर आम्ही त्याला काशीराम रुग्णालयात नेले, तेथेही औषध उपलब्ध नव्हते. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील शर्मा यांनी फोन उचलला नाही. यामुळे शासकीय रुग्णालयात आम्हाला दाद मिळत नसल्याने आम्ही कोणाकडे मदत मागायची हात प्रश्न आमच्यासमोर पडला आहे. मागच्या वर्षी नोएडातील लोटस बुलेवर्ड या भागात कुत्र्याने चावा घेतल्याने एका बालकाचा मृत्यू झाला होता. तरीही याची कोणाला जाग आली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.