निक्की हत्याकांडात मोठा खुलासा!
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : निक्की यादव खून प्रकरणामध्ये दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील पाच नवीन अटकेमुळे मुख्य आरोपी साहिल गेहलोतला त्याच्या कुटुंबीयांकडून मदत मिळाल्याचं उघड झालं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 23 वर्षीय निक्कीच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी रात्री अटक करण्यात आलेल्या या पाच जणांनी या कटामागचं कारण सांगितलं आहे. साहिल गेहलोतच्या कुटुंबाच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करण्यासाठी निक्कीला संपवण्याचा प्लॅन रचल्याचे आरोपींनी सांगितले. निक्की खून प्रकरणात साहिलला पोलीस कर्मचाऱ्याची मदत या हत्येप्रकरणी एका पोलिसाचीही चौकशी सुरू आहे. निक्कीची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवण्यात या पोलीस कर्मचाऱ्याने साहिलला मदत केल्याचा संशय आहे. यानंतर तो त्याच्या लग्नालाही गेला. गुन्हा घडल्यानंतर चार दिवसांनी 14 फेब्रुवारी रोजी खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोतने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना त्याच्या ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये नेले जेथे त्याने निकीचा मृतदेह लपविला होता. निक्की यादवच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी साहिल गेहलोत (24) याचे वडील, त्याचे दोन नातेवाईक आणि दोन मित्र, ज्यांपैकी एक दिल्ली पोलिसात हवालदार आहे, यांना अटक केली आहे. निक्की यादवपासून सुटका करण्यासाठी कट रचण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, साहिलच्या चौकशीदरम्यान असे समोर आले आहे की, गेहलोतच्या कुटुंबीयांना निक्की यादवसोबतच्या त्याच्या लग्नाची माहिती होती. पण ते त्याला विरोध करत होते. ‘निक्कीपासून सुटका करण्यासाठी घरच्यांनी साहिलवर दबाव आणला’ तपासाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘साहिल गेहलोतने 2020 मध्ये आर्य समाज मंदिरात निक्की यादवसोबत लग्न केले. दोघांनीही आपापल्या घरच्यांना लग्नाची माहिती दिली नाही. मात्र, जेव्हा गेहलोतच्या आई-वडिलांनी त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधण्यास सुरुवात केली आणि त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने शेवटी त्याचे लग्न झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले. वाचा - लग्नाला जाण्यापासून रोखल्यावर पत्नीने दिला जीव, पतीनेही उचलले भयानक पाऊल पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, साहिलचे निक्कीसोबत लग्न झाल्याची माहिती गेहलोतच्या कुटुंबियांना समजली. तेव्हा त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्याने सांगितले की, “अनेक वेळा या आरोपींनी निक्की यादवला सोडण्यासाठी आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्याला राजी केले. ते त्याच्यावर सतत दबाव टाकत होते आणि तोही त्याच्या कुटुंबीयांना समजवण्यात अपयशी ठरला. पोलिसांनी सांगितले की, दुसऱ्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर, आरोपी गेहलोतला निक्कीपासून सुटका करण्यासाठी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. प्रवासाच्या बहाण्याने मारण्याची योजना होती! आरोपींनी निक्की यादवपासून सुटका मिळवण्यासाठी चर्चा करण्यास सुरुवात केली. तिला सहलीवर नेण्याची संपूर्ण योजना केवळ एक डाव होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना दुसऱ्या लग्नाच्याआधी निक्कीला संपवायचं होतं. गेहलोतने देखील ठरवलं की निक्कीला आपल्यासोबत बाहेर येण्यासाठी पटवून देईल. यावेळी जेव्हा वाटेत संधी मिळेल तेव्हा तो प्रवासादरम्यान तिला मारून टाकेल. त्याने सांगितले की, ‘दुसर्या लग्नापूर्वी निक्कीच्या हत्येचा कट रचला गेला होता, जो गेहलोतने पार पाडला. तिला (यादव) मारल्यानंतर साहिलने त्याच्या वडिलांसह इतर आरोपींना माहिती दिली. वास येणार नाही आणि नंतर त्याची विल्हेवाट लावू या विचाराने त्यांनी मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. वाचा - लग्नाच्या 6 महिन्यातच पती-पत्नीमध्ये वाद, प्रकरण कोर्टात अन् घडलं भयानक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निक्की यादवच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की त्यांना तिचे नाते किंवा गेहलोतसोबतचे लग्न याबद्दल माहिती नाही. मृताच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की, तिला फक्त निक्की यादव आणि गेहलोत हे दोघे जवळचे मित्र आहेत हे माहीत होते बाकी काही नाही.
निक्की आणि साहिलच्या लग्नात सहभागी असलेल्या लोकांचीही चौकशी होणार या प्रकरणात पोलीस निक्की यादव आणि साहिल गेहलोत यांच्या लग्नात सहभागी असलेल्या साक्षीदारांचीही चौकशी करणार आहेत. विशेष पोलिस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव म्हणाले, “गेहलोतचे वडील वीरेंद्र सिंग, दोन भाऊ (नातेवाईक) आशिष आणि नवीन आणि साहिलचे दोन मित्र अमर आणि लोकेश यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर हत्येशी संबंधित भूमिकेची पुष्टी झाल्यानंतर त्यांना अटक केली. त्यांनी सांगितले की दिल्ली पोलिसातील कॉन्स्टेबल नवीन हा मुख्य आरोपी साहिल गेहलोतचा नातेवाईक आहे. गेहलोत हे आधीच पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.