नाशिक, 31 डिसेंबर : आपण जेवढा संघर्ष करतो तेवढं आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. काहीवेळा काही अनपेक्षित घटना घडतात. पण त्या घटनांमधून आपल्याला खचून जायचं नसतं. त्या घटनांमधून आपल्याला शिकायचं असतं. आपली चूक समजून घेऊन पुढे पुन्हा तशी चूक होणार नाही, याची काळजी घ्यायची असते. जरी तसी चूक पुन्हा झाली तरी पुन्हा जोमाने काम करायचं. आपल्या हातात यश नक्की येतं. परिस्थिती कशीही असूद्या यश हे संघर्ष केला की मिळतंच. या संघर्षाच्या प्रवासादरम्यान आपल्याकडून काही चूक झाली तर लगेच निराश व्हायचं नाही. त्या चुकीतून शिकायचं आणि चांगली वाट धरायची. कारण त्या चुकीवर स्वत:चं आयुष्य संपवणं ही शिक्षा असूच शकत नाही. उलट आपल्याला नैराश्य न येऊ देता, परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हायला हवं. होईल ते बघून घेऊ, अशा भावनेतून लढता यायला हवं. पण नाशिकमध्ये एका 22 वर्षीय तरुणीने हार मानली. तिने क्षुल्लक कारणावरुन वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या या निर्णयाने कुटुंबावर केवढं मोठं संकट कोसळलं असेल याची कल्पना तिने आधी का केली नसावी? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामुळे तरुणांना आत्महत्या करण्याआधी जरा विचार करा आणि लढा, असं आवाहन काही जणांकडून केलं जातंय. नेमकं काय घडलं? नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-वडिलांनी क्लासच्या फीसाठी दिलेले पैसे हरवले म्हणून 22 वर्षीय तरुणीने टोकाचा निर्णय घेतला आहे. या तरुणीने गळफास घेत आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. या तरुणीचं नाव श्रुती सानप असं होतं. श्रुतीने अशाप्रकारे टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिक आणि तिच्या महाविद्यालयातील शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे. याशिवाय या घटनेमुळे नाशिक शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : मित्राच्या Whatsapp ला बहिणीचा फोटो, संतापलेल्या भावाने केले चाकूने वार पोलिसांची प्रतिक्रिया श्रुती नाशिकच्या सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ही मुळची बीडची आहे. ती महाविद्यालयाला लागून असलेल्या वसतिगृहात राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुती ही दोन दिवसांपूर्वी आपल्या मूळगावावरुन परत आली होती. क्लासच्या फीसाठी तिने आईवडीलांकडून सहा हजार रुपये आणले होते. मात्र प्रवासादरम्यान तिच्याकडून पैसे हरविलेले होते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात समोर आलाय. हेही वाचा : अफगाणिस्तानमध्ये एका वेळच्या अन्नासाठी संघर्ष! पैशांसाठी अल्पवयीन मुलांची विक्री श्रुती सानप ही नाशिकच्या सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने तिच्या राहत्या खोलीत आत्महत्या केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. मात्र तिच्या अशा मृत्यूने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते.