नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : सिगारेट ओढण्याची सवय घातक आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सिगारेटच्या मदतीने एखादं प्रकरण सोडवलं जाऊ शकतं, तेही खुनाचं प्रकरण! ही एक अशी घटना आहे जी मर्डर मिस्ट्री चित्रपटासारखीच वाटू शकते. नुकतंच अमेरिकेत पोलिसांनी 52 वर्षांनंतर एका खुनाचं गूढ उकललं आहे. तेही वापरलेल्या सिगारेटच्या मदतीने. पती आणि सासूची हत्या; खोल दरीत मृतदेहाचे तुकडे अन्..7 महिन्यांनी खुलासा, त्या हत्याकांडाची संपूर्ण कहाणी NBC न्यूजनुसार, अमेरिकेत 24 वर्षीय वरमोंट शाळेतील शिक्षकाच्या हत्येचं प्रकरण चर्चेत होतं. हे 52 वर्ष जुनं प्रकरण आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना वापरलेले सिगारेटचे तुकडे सापडले. सिगारेटच्या तुकड्यावर सापडलेल्या डीएनए सॅम्पलमुळे पोलिसांनी तब्बल 52 वर्षांनंतर या प्रकरणाची उकल केली. या सिगारेटच्या मदतीने पोलिसांना रिटा कर्रनच्या मारेकरी शेजाऱ्यापर्यंत पोहोचण्यात यश आलं. ज्याने गळा दाबून रिटाचा खून केला होता. रीटा 19 जुलै 1971 रोजी आपल्या अपार्टमेंटमध्ये रूममेट्सना मृत सापडली होती. मारेकरी म्हणून ओळखला जाणारा व्यक्ती विल्यम डेरुस , रीटाच्या अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्याच्या पत्नीसोबत राहत होता. पण त्यावेळी त्याला कधीच संशयित मानले गेले नाही. पोलीस विभागाच्या डिटेक्टीव्ह सर्व्हिसेस ब्युरोचे कमांडर जिम ट्राइब यांनी सांगितले की, ‘डेरुस आणि त्याची पत्नी मिशेल यांनी हत्येच्या रात्री आपण घरीच असल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यांनी काहीही ऐकलं किंवा पाहिलं नाही, असंही ते म्हणाले होते. यानंतर हे प्रकरण थंडावलं, पण 1971 साली या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुरावा म्हणून सिगारेटचा तुकडा जपून ठेवला होता. याच तुकड्याने अखेर खुनाचं गूढ उकललं. खून केल्यानंतर मारेकरी आपल्या पत्नीला सोडून थायलंडला बौद्ध भिक्षू बनण्यासाठी पळून गेला. 1974 मध्ये तो अमेरिकेत परतला आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहत होता. नंतर त्याने 1989 मध्ये ड्रग्सचं सेवन केलं आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील एका हॉटेलमध्ये त्याचा मृत्यू झाला.