JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / श्रीमंत सासूने केला गरीब जावयाचा खून; म्हणाली, जावयाच्या गरिबीमुळे प्रतिष्ठेला धक्का

श्रीमंत सासूने केला गरीब जावयाचा खून; म्हणाली, जावयाच्या गरिबीमुळे प्रतिष्ठेला धक्का

आपल्या मुलीशी लग्न केलेला जावई (son in law) गरीब (poor) असून त्यामुळे प्रतिष्ठा (prestige) कमी होत असल्याच्या रागातून श्रीमंत सासूने सुपारी देऊन जावयाची हत्या (murder) केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 3 ऑगस्ट : आपल्या मुलीशी लग्न केलेला जावई (son in law) गरीब (poor) असून त्यामुळे प्रतिष्ठा (prestige) कमी होत असल्याच्या रागातून श्रीमंत सासूने सुपारी देऊन जावयाची हत्या (murder) केली. चार वर्षांपूर्वी या महिलेच्या मुलीचा कामगार असणाऱ्या मुलाशी प्रेमविवाह झाला होता. मात्र ही बाब तिच्या आईला मान्य नव्हती. त्या रागातून तिनं जावयाचा खून करण्याचा डाव आखला. अशी आखली योजना चार वर्षांपूर्वी ग्यारसीदेवीच्या मुलीनं विनोदसोबत प्रेमविवाह केला होता. ती गर्भवती असल्याने सध्या माहेरी राहत होती. आपल्या जावयाचं आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आणि त्याचं राहणीमान कनिष्ठ असल्यामुळे आपली समाजातील पत कमी होत असल्याची रुखरुख विनोदची सासू ग्यारसीदेवीला होती. त्यातून तिने तिच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना विनोदच्या हत्येची सुपारी दिली. 36 वर्षीय जब्बरसिंह आणि 21 वर्षीय धनराज गोस्वामी यांना ग्यारसीदेवीनं 5 लाख रुपये देऊन विनोदचा खून करायला सांगितलं. असा झाला खून राजस्थानमधील जोधपूरमध्ये विनोद नावाचा त्याची पत्नी आणि सासू ग्यारसीदेवीला भेटायला गेला होता. तिथून परत येत असताना त्याला जब्बरसिंह आणि धनराज यांनी गाठलं आणि दुकानात नेलं. जब्बरसिंहच्या टेलरिंगच्या दुकानात त्याला दारू पाजण्यात आली आणि तो नशेच्या अधीन झाल्यावर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह पोत्यात भरला. रिक्षाचा व्यवसाय असणारा धनराज हे प्रेत घेऊन गेला आणि झाडीत ते टाकून दिलं. हे वाचा - छोट्या व्यापाऱ्यानं केलं मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण पोलिसांनी लावला छडा पोलिसांना हा मृतदेह मिळाल्यानंतर तपासाची चक्रं फिरली. हा मृतदेह विनोदचा असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याचा दिनक्रम शोधला. यामध्ये तो घटनेच्या दिवशी सासूरवाडीत गेल्याचं त्यांना समजलं. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. पोलिसी खाक्या दाखवताच सासू ग्यारसीदेवीनं तोंड उघडलं आणि सर्व कारनामा उघड झाला. पोलिसांनी ग्यारसीदेवीसह इतर दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या