जोधपूर, 3 ऑगस्ट : लॉकडाऊनच्या (lock down) काळात व्यवसाय (business) बंद असल्यामुळे झालेलं नुकसान (loss) आणि वाढलेलं कर्ज (Loan) यामुळे त्रस्त झालेल्या एका व्यापाऱ्यानं (businessman) दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण केलं. अपहरण करून या मुलाला तो दूर घेऊन गेला आणि त्याच्या सुटकेसाठी 1.5 कोटी (1.5 crore ransom) रुपयांची लाच मागितली. मात्र पोलिसांनी त्याचा हा डाव हाणून पाडला.
अशी आखली योजना
राजस्थानमधील जोधपूरमध्ये सोन्याचा व्यापार करणारा आरोपी देवेश सोनी आणि शहरातले सोन्याचे बडे व्यापारी लक्ष्मण सोनी यांचे काही दिवसांपासून व्यापारी संबंध होते. देवेश हा लक्ष्मण सोनींना दागिने विकत असे. मात्र लॉकडाऊनच्या काळात दुकान बंद ठेवावं लागल्यामुळे त्याच्यावर कर्ज झालं होत. कर्जदारांच्या सातत्यानं येणाऱ्या फोनला देवेश वैतागला होता. त्यामुळं धनाढ्य असणाऱ्या लक्ष्मण सोनी यांच्या मुलाचं अपहरण करण्याची त्याने योजना आखली.
असं केलं अपहरण
लक्ष्मण सोनी यांचा 11 वर्षांचा मुलगा सायकलवरून घरी चालला होता. त्यावेळी बाईकवरून आलेल्या देवेशनं त्याला थांबवलं. तुझ्या वडिलांचं एक पार्सल आलं असून तू माझ्यासोबत बाईकवरून चल, असं त्याला सांगितलं. आपली सायकल तिथेच ठेऊन हा मुलगा त्याच्यासोबत गेला. मात्र बराच वेळ झाला तरी बाईकचा प्रवास संपत नसल्यानं मुलानं भावेशला विचारणा केली. त्यावेळी त्याला शांत राहण्याची दटावणी करून त्यानं बाईक सुरुच ठेवली. मुलगा गायब झाल्यामुळे चिंतेत असणाऱ्या सोनी कुटुंबाला भावेशनं 6 तासांनी फोन केला आणि दीड कोटींची मागणी केली. दीड कोटी रुपये किंवा तेवढ्या किंमतीचं सोन सांगेल त्या जागी पोचवावं, अन्यथा मुलाचे हातपाय तोडण्याची धमकी त्यानं दिली.
पोलिसांनी लावला शोध
लक्ष्मण सोनी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली आणि स्थानिक लोपप्रतिनिधींनाही ही बाब कळवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. भावेश यांचा पुन्हा जेव्हा सोनी यांना फोन आला, तेव्हा त्याला बोलण्यात गुंगवून ठेवण्यात आलं. 5 लाख खंडणी देतो, 10 लाख देतो असं करत त्याच्याशी बार्गेनिंग कऱण्याचा प्रयत्न सोनी यांनी केला. या दरम्यान पोलिसांना त्याच्या लोकेशनचा शोध लागला आणि पोलिसांनी त्याला पकडलं.
हे वाचा -कर्कश आवाजासह नियमांचा फज्जा; संसदेपासून 500 मीटरवर बारबालांचा धांगडधिंगा
मुलाला मानसिक धक्का
या घटनेने लहान मुलाला जबर मानसिक धक्का बसला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kidnapping, Rajasthan