JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / मुलाचे वर्तन सुधरत नव्हते, जन्मदात्याने आईने मुलाची दिली सुपारी अन्..., यवतमाळ हादरलं

मुलाचे वर्तन सुधरत नव्हते, जन्मदात्याने आईने मुलाची दिली सुपारी अन्..., यवतमाळ हादरलं

महाराष्ट्राला हादरवणारी घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

जाहिरात

file photo

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 30 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने सुपारी देवून आपल्या मुलाची हत्या केली. पोलीस तपासादरम्यान, धक्कादायक कारण समोर आले आहे. योगेश विजय देशमुख (25 रा. नेरपिंगळी ता. मोर्शी जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण - मुलाचे वर्तन सुधारत नाही, त्यामुळे आईनेच मुलाच्या खुनाची सुपारी दिली. त्यासाठी मुलाचा मावसा, मावशी आणि मावस भाऊ यांची मदत घेण्यात आली. दोघांनी दोन हजार रुपये ॲडव्हॉन्स घेतले आणि मुलाला चौसाळा जंगलात नेत त्याठिकाणी तेथे त्यांची गळा आवळून आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना 20 एप्रिल रोजी घडली होती. मात्र, यानंतर ती रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी मृताच्या आईसह सहा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे या प्रकरणात पोलिसांनी त्याची आई वंदना विजय देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी, मावसभाऊ लखन चौधरी तिघे रा. देवीनगर यवतमाळ यांना अटक केली. तर सुपारी घेवून योगेशची हत्या करणारे विक्की भगत व राहुल पठाडे रा. देवीनगर लोहारा यांनाही ताब्यात घेतले आहे. आईने काय म्हटलं - मुलाचा प्रचंड त्रास आहे, त्याच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले, असे मृत मुलाच्या आईने पोलिसांना सांगितले. मुलाला त्याच्या गावावरून यवतमाळात पाठविले. तो मामाकडे काही दिवस राहिला. या दरम्यान आई वंदना हिने बहिण उषा चौधरी हिच्या घरी जावून योगेशच्या खुनाचा कट रचला. तसेच पाच लाख रुपयात खुनाची सुपारी देण्याचे ठरले होते. त्यापैकी दोन हजार रुपये ॲडव्हॉन्स देण्यात आले होते. यानंतर विकी भगत आणि राहुल पठाडे या दोन्ही आरोपींनी योगेशला 20 एप्रिल रोजी चौसाळा जंगलात नेत त्याची हत्या केली. अशी पटली मृताची ओळख - दरम्यान, हत्येनंतर सुपारी घेणारे विक्की आणि राहूल ठरल्याप्रमाणे, पाच लाख रुपयांची मागणी करू लागले. पैसे देण्यासाठी योगेशची आई आणि मावशी यांच्यावर दबाव आणू लागले. प्रतिसाद मिळत नसल्याने 29 एप्रिल रोजी विक्की भगत याने डायल 112वर कॉल केला. तसेच चौसाळा जंगलात मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी यावेळी पाहिले असता, योगेशचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तसेच त्याच्या खिशात डॉक्टरची चिठ्ठी सापडली. त्यावर योगेशच्या आईचे नाव आणि संपर्क क्रमांक नमूद होता. या आधारावरून लोहारा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली आणि तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी योगेशचे मामा प्रफुल्ल वानखेडे रा. बांगरनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध कट रचून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार दीपमाला भेंडे, पोलीस उपनिरीक्षक सारिक फुसे, जमादार श्याम पांढरकर, संतोष आत्राम, जयंत ब्राम्हणकर, दिलीप सावळे, नितीन गजभार यांनी तपास पूर्ण करून आरोपींना अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या