JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Mob Lynching: गावकऱ्यांचं सैतानी कृत्य, झाड तोडल्याच्या रागातून अमानूष मारहाण करत जिवंत जाळलं

Mob Lynching: गावकऱ्यांचं सैतानी कृत्य, झाड तोडल्याच्या रागातून अमानूष मारहाण करत जिवंत जाळलं

केवळ जंगलातील वाळलेली झाडं तोडून ती चोरून नेल्याच्या संशयातून ग्रामस्थांनी त्याला अमानूष मारहाण केली आणि त्याला जिवंत जाळले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 4 जानेवारी: गावाजवळ (Village) असणाऱ्या जंगलातील झाड (Wood in the tree) तोडल्याचा आरोप करत एका ग्रामस्थाला (villager) गावातील जमावाने (Mob) अमानूष मारहाण (beaten) करत पेटवून (Burned alive) दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. झारखंडच्या सिमडेगा भागात ही घटना घडली असून संजू प्रधान नावाच्या तरुणाला जिवंत जाळण्यात आलंय. संजूनं जंगलात घुसून लाकूड तोडण्याचा प्रयत्न केलाच कसा, असा सवाल करत गावकऱ्यांनी त्याला अमानुष मारहाण केली. अशी घडली घटना गावातील संजू प्रधान नावाचा तरुण जंगलातून वाळलेली झाडं तोडून त्याचं लाकूड घेऊन जात असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी त्याला रोखलं आणि जाब विचारला. त्याचं काहीही म्हणणं ऐकून न घेता त्याला मारहाण करायला सुरुवात केली. गावातील सुमारे 250 ते 300 जणांचा जमाव त्याच्या अंगावर चालून गेला आणि त्याला जबर मारहाण करण्यात आली. पत्नी आणि आईची मध्यस्थी संजूला गावकरी मारत असल्याचं पाहून त्याची आई आणि पत्नी समोर आल्या आणि गावकऱ्यांना विनंती करू लागल्या. त्याने जरी काही चूक केली असेल तरी त्याला आता सोडून द्या, असं गावकऱ्यांना विनवू लागल्या. मात्र गावकरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही लोकांनी पोलिसांना याची कल्पना दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र सुरुवातीला ग्रामस्थ पोलिसांनाही गावात येऊ देत नव्हते. पोलिसांना काही अंतर दूरच ग्रामस्थांनी रोखून धरलं. हे वाचा- Online Game खेळताय, सावधान! फक्त एक छोटीशी चूक आणि बँक अकाउंट रिकामं होईल संजूला जिवंत जाळले़ अमानूष मारहाण करूनही ग्रामस्थांचा राग काही शांत झाला नाही. त्यांनी काही लाकडं गोळा केली, ती पेटवली आणि संजूच्या अंगावर ती टाकून त्याला पेटवून दिलं. पत्नी आणि आईच्या डोळ्यांदेखत संजूला गावकऱ्यांनी पेटवून ठार मारलं. हा अमानूष मृत्यू पाहून दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. या अमानूष आणि राक्षसी कृत्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण तयार झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या