JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 'मला नवरीप्रमाणे सजवा'; इमोशनल सुसाईट नोट लिहित कपलची लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यात आत्महत्या

'मला नवरीप्रमाणे सजवा'; इमोशनल सुसाईट नोट लिहित कपलची लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यात आत्महत्या

एका बँक कर्मचाऱ्याने (Suicide of Bank Employee) आणि त्याच्या पत्नीने विष प्राशन केलं आहे. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयात नेत असताना पतीचा मृत्यू झाला, तर बुधवारी सकाळी पत्नीचा मृत्यू झाला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर 09 डिसेंबर : इंदूरमध्ये एका बँक कर्मचाऱ्याने (Suicide of Bank Employee) आणि त्याच्या पत्नीने विष प्राशन केलं आहे. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयात नेत असताना पतीचा मृत्यू झाला, तर बुधवारी सकाळी पत्नीचा मृत्यू झाला. त्यांच्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. यात आयुष्याला कंटाळून आत्महत्या (Married Couple Commit Suicide) केल्याचं लिहिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन व्ह्यू कॉलनीतील आयुष्मान अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 301 मध्ये राहणारे मोनू गुप्ता आणि त्यांची पत्नी अंजली यांनी मंगळवारी संध्याकाळी विष प्राशन केले. यानंतर वेदनेने तडफडत ते फ्लॅटच्या बाहेर आले. शेजाऱ्यांनी डायल 100 वर तक्रार केली होती. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे मोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अंजलीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांचं याच वर्षी लग्न झालं होतं. मोनू हा कोटक महिंद्रा बँकेत कामाला होता. त्याच्या घरात बँकेचे कार्डही सापडले आहे. हेही वाचा -  क्रूर प्रियकराचं गंभीर कृत्य, रात्रीच्या अंधारात एक्सप्रेस मॉलजवळ प्रेयसीची हत्य एसआय गौरव तिवारी आणि एफआरव्ही कॉन्स्टेबल गौतम पाल घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी जोडप्याच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली. त्यात लिहिलं आहे, की आयुष्यात खूप अडचणी आहेत. आता जगायची इच्छा नाही, स्वेच्छेने जीव देत आहोत. गावातच अंत्यसंस्कार करावेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपं इथे भाड्याने राहत होतं. अंजली ही मूळची बेटमाची, तर मोनू मुसाखेडी परिसरातील रहिवासी होता. एप्रिलमध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच दोघेही मुसाखेडी येथून लसुडिया परिसरात राहू लागले. मोनूला एक लहान बहीण आहे. त्याचे वडील फास्ट फूडचा स्टॉल चालवतात. मोनू बँकेत खाती उघडायची कामं करायचा. सुसाईड नोटमध्ये अंजलीने लिहिलं की तिला नववधूप्रमाणे सजवावं आणि नवरीच्याच वेशभूषेत तिच्यावर अंत्यसंस्कार करावेत. हेही वाचा -  औरंगाबाद पुन्हा हादरलं! डॉक्टरच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला, सुरा पोटात खुपसला मोनूच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मोनू एक दिवस आधीच अंजलीला घेऊन घरी सगळ्यांना भेटण्यासाठी आला होता. तेव्हाच त्यांचं शेवटचं त्याच्यासोबत बोलणं झालं. या आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दोघांचा मोबाईल आणि सुसाईड नोट जप्त केली आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या