बीड, 13 जून : बीड जिल्ह्यातील (Beed News) 45 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीच्या पत्नीनेच त्याची हत्या (Wife killed husband for 1 crore life insurance money ) केल्याचं समोर आलं आहे. जीवन विम्याच्या 1 कोटींच्या रकमेसाठी पत्नीने दोन साथीदारांसह मिळून स्वत:च्याच पतीची हत्या केली. मंचक गोविंद पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते लातूरमधील रेनापूर इथं राहत होता. 11 जून रोजी अहमदनगर हायवेवरील पिंपळगाव रोडवर पवारांचा मृतदेह सापडला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांची पत्नी गंगाबाई (37) हिने हा अपघात असल्याचं सांगितलं. मात्र हत्येला अपघात असल्याचं सांगणाऱ्या गंगाबाईवर पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसी खाक्या दाखवित त्यांनी गंगाबाईची चौकशी केली. शेवटी तिने आपला गुन्हा कबुल केला. जीवन विम्याच्या 1 कोटी रुपयांसाठी दोन साथीदारांसह मिळून तिने पतीची हत्या केल्याचं सांगितलं.पवारांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या डोक्यावर (Wife kills husband) मारहाण केल्यानंतर अतिरक्त रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला असावा असं दिसतं. पतीच्या हत्येसाठी महिलेने दोघांना सुपारी दिली होती. यासाठी तिने प्रत्येकाला 2 लाख रुपये देण्याचं कबुल केलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केली असून पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे.