अजमेर, 12 जून : राजस्थानमधील (Rajasthan News) अजमेर जिल्ह्यात तीर्थ नगरी पुष्कर भागात खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. येथील लुटारू नवरीने कुटुंबातील दागिन्यांसह नणंदेलाही आपल्यासोबत पळून गेली. ज्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. ज्यात नवरी आपल्या नणंदेलाही सोबत घेऊन जात आहे. कुटुंबीयांनी या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लुटारू नवरीचं येतू नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. त्याला ऐकू यायला आणि बोलायला अडचण होती. त्यामुळे त्याचं लग्न ठरत नव्हतं. 27 मे रोजी पंच कुंड रोड निवासी यतूचं लग्न झारखंडच्या जुम्मा रामगडमध्ये राहणाऱ्या पूजासोबत पार पडलं होतं. यतूच्या वडिलांनी सांगितलं की, मुलीच्या कुटुंबीयांनी साडे तीन लाख रुपये लग्नाच्या खर्चासाठी घेतले होते. लग्नानंतर सर्व काही ठीक सुरू होतं. मात्र अचानक रात्री सून घरातून गायब झाली. यानंतर पीडित वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून दोन्ही तरुणींचा शोध सुरू… पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर आलं की, लुटारू नवरी नंदेला घेऊन झारखंडला गेली आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांशी संपर्क करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नवरी आणि तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यतूच्या वडिलांनी सांगितलं की, यतू एका खासगी कंपनीत काम करतो. त्या दिवशी तो सकाळी लवकर कामासाठी निघून गेला. संधी साधत लुटारू नवरीने सासू आणि सासऱ्याला खोलीत बंद केलं आणि नणंदेला घेऊन फरार झाली. खोलीत बंद असलेले सासू-सासरे बराच वेळ आवाज देत होते. शेजारच्यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांना बाहेर काढलं. यानंतर शुक्रवारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. सून आपल्यासोबत 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.