JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / धक्कादायक! युवकानं पत्नी अन् सासूची केली निर्घृण हत्या; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

धक्कादायक! युवकानं पत्नी अन् सासूची केली निर्घृण हत्या; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

एका महिलेला टीकटॉक व्हिडिओ (TikTok Video) बनवल्याची किंमत आपला जीव गमवून चुकवावी लागली आहे. या महिलेची हत्या कऱणारा कोणी दुसरा-तिसरा नसून महिलेचा पतीच (Husband Killed His Wife) आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराची 28 जून : एका महिलेला टीकटॉक व्हिडिओ (TikTok Video) बनवल्याची किंमत आपला जीव गमवून चुकवावी लागली आहे. या महिलेची हत्या कऱणारा कोणी दुसरा-तिसरा नसून महिलेचा पतीच (Husband Killed His Wife) आहे. इतकंच नाही तर या आरोपीनं आपल्या सासूचीदेखील निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीमधील (Karachi) लांडी परिसरातील शेरपाओ कॉलनीत रविवारी घडली आहे. इशाक असं या घटनेतील आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. ‘Samaa न्यूज’नं दिलेल्या वृत्तानुसार, कायदाबाद पोलीस ठाण्याचे एसएचओ गौस बख्श यांनी सांगितलं, की इशाक आपली पत्नी रेश्मा हिच्यावर विना परवानगी घराबाहेर पडणं, TikTokवर व्हिडिओ अपलोड करणं आणि लोकांसोबत फोनवर बोलणं या गोष्टींमुळे नाराज होता. याच कारणावरुन त्याचं आपल्याय सासूसोबतही दोन-तीन वेळा भांडण झालं होतं. लग्नाच्या एका महिन्यातच सासरच्यांनी दाखवला रंग; अमानुष छळामुळे विवाहितेचा मृत्यू रेश्माला TikTok वर व्हिडिओ अपलोड करण्याची आवड होती. त्यामुळे, नवऱ्यानं अनेकदा विरोध करूनही ती व्हिडिओ अपलोड करत असत. याच कारणावरुन दोघांमध्ये एकदा वादही झाला होता. वैतागून रेश्मा आपल्या माहेरी निघून गेली होती. असा आरोप आहे, की रविवारी इशाक तिच्या माहेरी पोहोचला आणि आपली पत्नीसोबतच सासूवरही गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. बेंगळुरूत निवडणूक वॉर; डॉन नणदेकडून वहिनीचा खून या घटनेनंतर इशार फरार झाला आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याच वर्षी 2 फेब्रुवारीला कराची गार्डन टाउन एरियामध्ये चार लोकांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. हे चारही टीकटॉकवर व्हिडिओ अपलोड करत असत. मुस्कान, आमिर, रेहान आणि सज्जाद अशी या चौघांची नावं होती. पोलिसांनी सांगितलं, या घटनेतील मुख्य आरोपी सवायराची आमिरसोबत मैत्री होती. मात्र, आमिरचं मुस्कानसोबत राहाणं आरोपीला आवडत नसे. हत्येच्या काही वेळ आधीदेखील मुस्कान आणि आमिरनं TikTokवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. याच कारणामुळे नाराज असलेल्या सवायरानं चौघांची हत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या