Home /News /national /

बेंगळुरूत स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन महिला डॉनमध्ये टोळीयुद्ध; एकीचा खून

बेंगळुरूत स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन महिला डॉनमध्ये टोळीयुद्ध; एकीचा खून

Bengaluru City Council Elections: जुन्या बेंगळुरू (Bengaluru) शहरात स्थानिक राजकारणातून (Local Politics) रक्तरंजित टोळीयुद्धाचा (Gang war) एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.

बेंगळुरू, 28 जून: जुन्या बेंगळुरू (Bengaluru) शहरात स्थानिक राजकारणातून (Local Politics) रक्तरंजित टोळीयुद्धाचा (Gang war) एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. विशेष म्हणजे दोन महिला या टोळी युद्धाच्या केंद्रस्थानी असून, एका माजी नगरसेविका रेखा हिचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे. तर हा खून केल्याचा आरोप असणारी दुसरी महिला ही तिची नणंद आहे. तिच्या नावावर खून, अंमली पदार्थ आणि दारूची तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. यंदा बेंगळुरूमध्ये महापालिका निवडणुका (Corporation Election) होणार आहेत. त्यामुळे रेखाच्या हत्येमागंही राजकीय कारण असल्याचं मानलं जात आहे. चलावादी पाल्या प्रभागातील माजी नगरसेविका (Former Corporator) रेखा कादिरेश (Rekha Kadiresh) या आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा होती, परंतु 24 जून रोजी भाजपा प्रभाग कार्यालयाबाहेर त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आता पाच जणांना अटक केली. प्रत्यक्षदर्शींसह सीसीटीव्ही फुटेजचा पुराव्याच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. यात मुख्य आरोपी 50 वर्षीय माला राजकन्नन (Mala Rajkannan) ही आहे. गेली दोन दशकं ती या भागात ‘गँग बॉस’ म्हणून ओळखली जाते. गेल्या काही वर्षांत तिनं मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली असून, यामध्ये पश्चिम बेंगळुरूमधील एका बहुमजली इमारतीचा समावेश आहे. रेखा यांचे पती एस. कादिरेश यांची ती मोठी बहीण आहे. तीन वर्षापूर्वी परिसरातील एका मंदिराबाहेर कादिरेशची हत्या करण्यात आली होती, तेव्हा पोलिसांना टोळी युद्धाशी याचा संबंध असल्याचा संशय आला होता. आता रेखा यांचा खूनही कौटुंबिक षड्यंत्र आणि स्थानिक राजकारणातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र पहिल्यांदाच कॉटनपेट गँग वॉरमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणात मालाची भूमिका संशयास्पद आहे कारण रेखा आपल्या पतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पुसून टाकून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत होती, मात्र कादिरेशच्या कुटूंबाला आणि सहकाऱ्यांना तिनं यापासून दूर ठेवलं होतं, याचा माला राजकन्नन हिला राग होता. हेही वाचा- Breaking News: जम्मूत मिलिट्री स्टेशनवर आढळलं ड्रोन, लष्कराकडून 25 राऊंड फायरिंग पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेखानं आपल्या विश्वासातील 20 ते 30 तरुणांना एकत्र केले होते. कादिरेशच्या कुटुंबीयांना पैसे देणं देखील तिनं थांबवलं होतं. रेखा हिनं महानगरपालिका निवडणूक लढवू नये आणि मालाच्या नणंदेला निवडणूक लढवू द्यावी असं तिला सांगण्यात आलं होतं; मात्र तिनं याला साफ नकार दिला. त्यामुळं तिची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे. एका पोलिस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ‘ स्थानिक टोळ्यांमधील हत्यासत्र अद्याप संपलेलं नाही. गेल्या काही दशकांतील बेंगळुरूच्या अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगार बघितल्यास एमपी जयराज, जेद्दारहल्ली कृष्णा, कॉटनपेट पुष्पा हे सर्वजण कॉटनपेटशी संबधित होते. त्यांना राजकीय वरदहस्त लाभलेला होता. हेही वाचा-  सावध व्हा! 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना भाजपचे (BJP) बेंगळुरू विभागाचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक एनआर रमेश म्हणाले की, ‘रेखा लोकप्रिय होती आणि पक्षानं यंदा तिला पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. ती निवडणूक जिंकेल अशी अपेक्षा होती.’
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bengaluru, Crime news

पुढील बातम्या