लग्नाच्या एक महिन्यातच सासरच्यांनी दाखवला रंग; अमानुष छळ केल्यानं विवाहितेचा मृत्यू

लग्नाच्या एक महिन्यातच सासरच्यांनी दाखवला रंग; अमानुष छळ केल्यानं विवाहितेचा मृत्यू

Crime in Nashik: विविध कारणांसाठी सासरच्यांनी छळ (Torture) केल्यानं मानसिक आणि शारीरिकरित्या खचलेल्या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू (Married woman death) झाला आहे.

  • Share this:

नाशिक, 28 जून: लग्न झाल्यानंतर एक महिनाही झाला नाही, तोपर्यंत एका तरुणीचा सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ (Physical abuse) करायला सुरुवात केली. सासरच्यांनी केलेला छळ (Torture) असह्य झाल्यानं विवाहितेचा अखेर दुर्दैवी मृत्यू (Married woman death) झाला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या कुटुंबीयांनी नवऱ्यासह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती खालावली असताना आरोपींनं तिच्याकडे दुर्लक्ष केल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

'तुला स्वयंपाक येत नाही, तू आमच्या लायकीची नाहीस, तू आम्हाला आवडत नाही, तुझ्या घरच्यांनी हुंडा दिला नाही, मानपान केला नाही. तू माहेराहून फर्निचरसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, पैसे आणले नाहीत तर तुला नांदवणार नाही,’असं सासरच्यांनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. मागील एक वर्षापासून सुरू असलेला हा छळ असह्य झाल्यानं पीडितेची प्रकृती खालावत गेली. यातच तिचा मृत्यू झाला आहे.

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, शुभांगी होनाजी ढिकले असं मृत्यू झालेल्या विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी मृताचे वडील होनाजी रामदास ढिकले यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की,  गेल्या वर्षी जूनमध्ये मुलगी शुभांगीचा विवाह दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमाला येथील जयेश संजय बस्ते यांच्याशी झाला होता. विवाहाच्या एक महिन्यातच पती जयेश, सासरे संजय जगन्नाथ बस्ते, सासू सरला बस्ते, नणंद कस्तुरी अतुल पाटील यांनी विवाहितेला त्रास द्यायला सुरुवात केली.

हेही वाचा-दुसऱ्या मुलासोबत बोलली म्हणून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला विहिरीत ढकलले

त्याचबरोबर घरात फर्निचर करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन, यासाठी शुभांगीचा छळ करण्यात आला. दरम्यान आरोपींच्या छळामुळे पीडित शुभांगीची प्रकृती खालावली. पण सासरच्यांनी जाणूनबुजून पीडितेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं. आजारी अवस्थेतच तिला माहेरी पाठवण्यात आलं. त्यामुळे शुभांगीचा मृत्यू झाल्याचा दावा फिर्यादीनं आपल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: June 28, 2021, 1:54 PM IST

ताज्या बातम्या