लखनऊ 24 जुलै : माणुसकीला काळीमा फासणारं एक प्रकरण उत्तर प्रदेशातील शामली येथून समोर आलं आहे. जिल्ह्यातील खेडा कुर्तान गावात एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या पुतणीची निर्घृण हत्या केली, कारण ती जेवणाच्या वेळी आंबे खाण्यास मागत होती. पोलिसांनी आरोपीला अटक करून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. 19 जुलै रोजी कांधला परिसरातील खेडा कुर्तान गावात राहणारी खुर्शीद यांची मुलगी खैरुनिशा बेपत्ता झाली होती. तिला शेवटचं जवळच राहणारे तिचे काका उमरदीन यांच्यासोबत पाहिलं गेलं होतं. संशयाच्या आधारे पीडित कुटुंबीयांनी उमरदीनवर गुन्हा दाखल केला होता. कांधला पोलिसांनी आरोपीला अटक केली असता धक्कादायक खुलासे झाले. फ्रिजमध्ये सापडलेला मृतदेह; प्रकरणात सख्खा भाऊच निघाला आरोपी, धक्कादायक कारण उघड कांधलाचे एसएचओ श्यामवीर सिंह यांनी मीडियाला सांगितलं की, पीडित खुर्शीद आणि उमरदीन यांचे घर जवळच आहे. दोघांचे कुटुंबीय एकमेकांच्या घरी अनेकदा जायचे. दरम्यान, मंगळवारी खुर्शीद यांची मुलगी खैरुनिशा ही उमरदीन यांच्या घरी पोहोचली, तेव्हा तो जेवण करून आंबे खात होता. ते पाहून ही मुलगीही आंबे मागू लागली. मात्र उमरदीनने तिला आंबा देण्यास नकार दिला. यानंतरही चिमुकली पुन्हा पुन्हा आंबे खाण्याचा हट्ट करू लागली. उमरदीन हे पाहून भडकला. मुलीच्या हट्टीपणामुळे चिडलेल्या आरोपीने प्रथम तिच्या डोक्यात रॉडने वार केले आणि नंतर धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मृत्यूनंतर आरोपीनी या मुलीचा मृतदेह एका गोणीत भरून ठेवला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या घरातून मुलीचा मृतदेह जप्त केला. वडिलांनी दिलं केकचं आश्वासन, पण पैसे न दिल्याच्या रागातून पदवीच्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल पोलिसांनी सांगितलं की या बेपत्ता मुलीचा शोध सुरू असताना आरोपी उमरदीन गावकऱ्यांसोबत मिळून मुलीचा शोध घेण्यासाठीही गेला होता. मात्र पोलिसांना संशय येताच त्याने तात्काळ पळ काढला. शामलीचे एएसपी ओपी सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांनी आरोपी उमरदीनला गावाजवळील जंगलातून अटक करून तुरुंगात पाठवलं. यासोबतच त्याच्याकडून खुनात वापरलेला चाकू आणि लोखंडी रॉडही जप्त करण्यात आला आहे.