ठाणे 20 जून : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यात एक तरुण दिवसाढवळ्या एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसतं (Man Brutally Beaten on Road). सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे सर्व भररस्त्यात सुरू आहे आणि लोक प्रेक्षक बनून हे सर्व फक्त पाहात राहिले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रेयसीचे हट्ट पुरवण्याच्या नादात बनला चोर; तब्बल 27 दुचाकी चोरणाऱ्या प्रियकराला अटक या घटनेचा व्हिडिओ न्यूज18 लोकमतकडे आहे. मात्र, हे दृश्य विचलित करणारं असल्यामुळे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला नाही. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हायरल व्हिडिओ उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील आहे. जो तुम्हाला अस्वस्थ करू शकतो. रविवारी दुपारी भरदिवसा रस्त्यावर रिक्षांच्या रांगेत डझनभर लोकांच्या उपस्थितीत एका तरुणाने दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करून त्याला जखमी केलं. रक्तस्त्राव झालेल्या जखमी व्यक्तीला हा तरुण बराच वेळ मारहाण करत राहिला. आधी नाव विचारलं; डिलिव्हरी बॉयची जात समजताच जेवणाची ऑर्डर स्विकारण्यास नकार देत केलं धक्कादायक कृत्य या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव संतोष चौघुले असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्याला मारहाण करणारा तरुण कोण? त्याने या व्यक्तीला का मारलं? या संपूर्ण घटनेचा तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.