JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / हे दृश्य विचलित करू शकतं! व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्तीला बेदम मारहाण, जीव गेल्यावरच सोडलं, धक्कादायक VIDEO

हे दृश्य विचलित करू शकतं! व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्तीला बेदम मारहाण, जीव गेल्यावरच सोडलं, धक्कादायक VIDEO

हार्दिक सुथारला ड्रग्जची सवय सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र याठिकाणी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यात हार्दिकचा मृत्यू झाला आहे

जाहिरात

व्यसनमुक्ती केंद्रात एका व्यक्तीला झालेल्या मारहाणीची अतिशय धक्कादायक घटना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद 11 मार्च : व्यसनमुक्ती केंद्रात एका व्यक्तीला झालेल्या मारहाणीची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुजरातच्या पाटणमधील असून या मारहाणीत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. पाटण येथील व्यसनमुक्ती केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. video : पुण्यात भीषण अपघात; भरधाव कारची धडक अर्धा किमी कारसोबत फरफटत गेला या घटनेत मेहसाणाच्या हार्दिक सुथारला ड्रग्जची सवय सोडण्यासाठी केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र याठिकाणी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार त्याला दीड तास बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही हाती आलं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हा व्यक्ती ओरडत होता. तो स्वतःच्या आयुष्याची भीक मागत राहिला, मात्र कोणीही त्याचं ऐकलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या