JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Crime News: अल्पवयीन मुलांची 25 लाखांसाठी अपहरण करुन हत्या, मित्रांनीच केला घात

Crime News: अल्पवयीन मुलांची 25 लाखांसाठी अपहरण करुन हत्या, मित्रांनीच केला घात

मयांकची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे आरोपींना वाटत होते. पैशांच्या आमिषाने त्यांनी मयांकचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 3 ऑगस्ट : मीरा रोड येथे 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काशिमिरा पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग ही महिला अजय (15) आणि मयांक सिंग (14) या दोन मुलांसह राहते. ती बोरीवलीच्या एका बारमध्ये गायिका म्हणून काम करते. रविवारी रात्री ती नेहमप्रमाणे कामावर गेली होती. रात्री 12 च्या सुमारास तिचा मुलगा मयांक हा घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगावात राजकारण तापलं, एकनाथ खडसेंच्या पत्नीसह 11 जणांविरोधात पोलिसांत तक्रार मंगळवारी दुपारी मयांकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी अफझल अन्सारी (22) आणि इम्रान शेख (24) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मयत मुलाचे मित्र आहेत. हैवान नवऱ्याने बायको-मुलांना अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं; 17 वर्षांनी दरवाजा उघडताच… मयांकची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे आरोपींना वाटत होते. पैशांच्या आमिषाने त्यांनी मयांकचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता. दरम्यान, मयांकला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली आणि नंतर त्याच्याच फोनने खंडणी मागितली, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी काशिमिरा पोलीस सखोल तपास करत असून त्यांनी नेमकी हत्या का केली? खंडणीसाठी केली की अन्य काही कारण होत? याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या