ब्राझिलिया, 02 ऑगस्ट : घराघरात नवरा-बायको वाद होतातच. काही वेळा या वादाचा परिणाम मुलांवरही होतो. पत्नी-पत्नी आपल्यातील भांडणाचा राग या मुलांवर काढतात. पण एक व्यक्ती इतकी हैवान बनली की तिने आपल्या बायको मुलांना एका अंधाऱ्या अस्वच्छ खोलीत डांबून ठेवलं. तब्बल 17 वर्षांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि भयंकर दृश्य दिसलं.
ब्राझीलमधील ही धक्कादायक घटना आहे. रियो डी जेनेरियोतील ग्वारटिबातील एका घरातून एका कुटुंबाला मुक्त करण्यात आलं आहे. किंचितसाही प्रकाश पोहोचणार नाही अशा खोलीत एका व्यक्तीने 17 वर्षे आपल्या बायको आणि मुलांना कैद करून ठेवलं. 2020 साली या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली.
हे वाचा - भिंतीतून टपकत होतं रक्त, फरशी-दरवाजेही झाले लालभडक; घरमालकाने सांगितलं घरातील धक्कादायक सत्य
आज तकने ब्राझिलियन न्यूज वेबसाइट G1च्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार ज्या घरातून महिला आणि मुलांची सुटका करण्यात आलं ते खूप अस्वच्छ होतं. तिथं प्रकाशही कमी होता. दोन्ही मुलांना बांधून ठेवण्यात आलं होतं. एका मुलाचं वय 19 तर एकाचं 22 वर्षे आहे.
पोलिसांच्या मते, दोन्ही मुलांना पाहून ती लहान असावीत असंच वाटत होतं कारण ती कुपोषणग्रस्त होती. दोघांनाही पाहिल्यानंतर ती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहतील असं वाटत नव्हतं.
हे वाचा - अंगात देवी आल्याचं दाखवून तलवारीने छोट्या बहिणीचं शिर धडापासून केलं वेगळं; वडील-काकांवरही हल्ला
या दाम्पत्याच्या लग्नाला 23 वर्षे झाली. जेव्हा महिलेचा मृत्यू होईल तेव्हाच तिचा नवरा तिला सोडेल, असं तिच्या नवऱ्याने सांगितल्याचं या पीडित महिलेने सांगितलं. लुइज अँटोनिया असं या आरोपीचं नाव आहे. ज्याला आता अटक करण्यात आलं आहे. महिलेसह तिच्या दोन मुलांना मुक्त करण्यात आलं आहे. महिला आणि मुलांची सुटका केल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.