JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / विवाहबाह्य संबंधाचा हादरवणारा शेवट; तरुणीने प्रियकराच्या पत्नीची केली भयानक अवस्था

विवाहबाह्य संबंधाचा हादरवणारा शेवट; तरुणीने प्रियकराच्या पत्नीची केली भयानक अवस्था

लग्नाच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने तिला पाच वर्षे लिव्ह इनमध्ये ठेवल्याचा आरोप ब्युटीशियनने केला आहे. प्रेयसी 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप प्रियकराने केला आहे.

जाहिरात

तरुणीने प्रियकराच्या पत्नीची केली भयानक अवस्था

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 20 मे : एका ब्युटीशियनने तिच्या विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तिच्या प्रियकरावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पतीनेही प्रेयसीवर अॅसिड हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने तिला पाच वर्षे लिव्ह इनमध्ये ठेवल्याचा आरोप ब्युटीशियनने केला आहे. प्रेयसी 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप प्रियकराने केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. ग्वाल्हेरच्या जनकगंज पोलीस स्टेशनच्या राम दवारा भागात राहणाऱ्या 32 वर्षीय श्वेता बन्सल यांच्यावर संजय नगर भागातील एका 34 वर्षीय ब्युटीशियनने हल्ला केला. 18 मे रोजी दुपारी 3 वाजता घडलेल्या या घटनेत श्वेता गंभीर जखमी झाली होती. तिला वाचवताना पती अमित बन्सलही भाजला. अपघातानंतर अमितने पत्नी श्वेता हिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. महिलेचे पाय कापून निर्घृण हत्या, 7 वर्षांनी आरोपीला कोर्टानं सुनावली शिक्षा अमित आणि श्वेता यांनी सांगितलं की, ब्युटीशियन त्यांना 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत आहे. अमितने 19 मे रोजी दुपारी 2 वाजता जनकगंज पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपी ब्युटीशियनविरुद्ध अॅसिड हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली. 18 मे रोजी दुपारी 3 वाजता विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर, 8 वाजता ब्युटीशियनने जनकगंज पोलीस ठाण्यात जाऊन अमितवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ब्युटीशियनने एफआयआरमध्ये सांगितलं की, अमितने तिच्याशी मैत्री केली आणि नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने आरोप केला आहे, की अमितने तिला 23 मे 2019 ते 15 मे 2023 पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ठेवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान त्याने लग्नाचं वचनही दिलं, पण लग्न केलं नाही. काही दिवसांपूर्वी अमितने फसवणूक करून तिला फ्लॅट रिकामा करायला लावला. ब्युटीशियनचा आरोप आहे, की ती अमितशी बोलण्यासाठी त्याच्या घरी गेली होती, पण तिने अॅसिड फेकलं नाही. तिला या प्रकरणात गोवण्यासाठी अॅसिड हल्ल्याची घटना घडवली आहे. ब्युटीशियनच्या तक्रारीवरून जनकगंज पोलिसांनी आधी रात्री 8 वाजता अमित बन्सलवर बलात्काराचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर पहाटे अडीच वाजता अमित बन्सल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि ब्युटीशियनवर अॅसिड हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला. लष्कर सर्कलचे सीएसपी केएम शियाज यांनी सांगितलं की, प्रेयसीच्या वतीने बलात्काराचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी प्रियकराने पत्नीवर अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी प्रेयसीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दोन्ही एफआयआरमधील तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या