JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Crime News: पत्नीला रात्री बेशुद्ध करायचा; मग अनोळखी पुरुषांना घरी बोलवायचं अन्..अखेर 10 वर्षांनी खुलासा

Crime News: पत्नीला रात्री बेशुद्ध करायचा; मग अनोळखी पुरुषांना घरी बोलवायचं अन्..अखेर 10 वर्षांनी खुलासा

तो पुरुषांना माजन येथील आपल्या घरी बोलावून पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 ते 2020 या कालावधीत बलात्काराच्या या घटना घडल्या

जाहिरात

पतीचं पत्नीसोबत हादरवणारं कांड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 22 जून : पती-पत्नीचं नातं अतिशय पवित्र असतं असं म्हणतात. मात्र आता याच नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. ज्यात एक पती इतका क्रूर झाला की तो दररोज रात्री आपल्या पत्नीला बेशुद्ध करण्यासाठी औषध पाजायचा. यानंतर तो तिच्यावर बलात्कार करण्यासाठी इतर पुरुषांना घरी बोलवायचा. हे त्याने 1-2 वेळा नाही तर अनेक वर्ष केलं. ही हादरवणारी घटना फ्रान्समधील आहे. ‘द टेलिग्राफ’मधील वृत्तानुसार, तब्बल दहा वर्षे तो हा क्रूरपणा करत राहिला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी बलात्काराच्या 92 घटनांची पुष्टी केली आहे. यातील 51 पुरुष असे आहेत, ज्यांचं वय 26 ते 73 वर्षे आहे. पोलिसांनी महिलेच्या आरोपी पतीला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. डोमिनिक पी असं आरोपी पतीचं नाव आहे. तो पुरुषांना माजन येथील आपल्या घरी बोलावून पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगायचा. डोमिनिकने कॅमेऱ्यात हे सगळं रेकॉर्ड केल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. “ABUSES” नावाच्या फाईलमध्ये USB ड्राइव्हवर त्याने हे फुटेज सेव्ह केलं होतं. जे पोलिसांनी जप्त केलं आहे. Ahmednagar News : फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 ते 2020 या कालावधीत बलात्काराच्या या घटना घडल्या. डोमिनिकच्या लग्नाला 50 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. इतकंच नाही तर त्यांना तीन मुलंही आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डोमिनिक ज्या पुरुषांना घरी बोलवायचा. त्यांना तीव्र वास टाळण्यासाठी तंबाखू आणि परफ्यूमवर बंदी घातली होती. कारण या वासाने त्याची पत्नी सुद्धीवर येईल, अशी भीती त्याला होती. इतकंच नाही तर तापमानात अचानक होणारा बदल टाळण्यासाठी तो पुरुषांना गरम पाण्यात हात धुण्यास सांगत असे. तसंच बाथरूममध्ये कपडे न काढता स्वयंपाकघरात कपडे उतरवण्यास सांगत. यासोबतच शाळेजवळ त्यांची वाहने पार्क करण्यात सांगत असे. शेजाऱ्यांचा संशय येऊ नये म्हणून अंधार पडल्यानंतर अंधारातून येण्यास-जाण्यास सांगत असे. काही लोकांनी असा दावा केला की त्याच्या पत्नीची यासाठी संमती नव्हती, हे त्यांना माहित नव्हतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या