जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Ahmednagar News : फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

Ahmednagar News : फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून बलात्कार

आरोपी शिक्षकाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी येथील लॉजवर अत्याचार केले.

  • -MIN READ Nagardeole,Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर : विद्यार्थ्यी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आळी आहे. शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. अहमदनगरच्या जामखेड शहरात ही घटना घडली आहे. आरोपी शिक्षकाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी येथील लॉजवर अत्याचार केले. शिक्षकाने आपल्याच शाळेतीत शिकत आसलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीला शाळेचा अभ्यास असल्याचं सांगून तिच्याशी स्नॅपचॅटवरुन संपर्क केला. यावरुन तिच्याशी अश्लिल बोलू लागला. तिला अर्धनग्न फोटो पाठवण्यासाठी सांगू लागला. हे फोटो त्याच्या हाती लागताच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली.

जायचं होतं अमेरिकेला पोहचले इराणमध्ये; गुजराती जोडप्याच्या छळाचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेमुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याची चर्चा नगरमध्ये रंगली आहे. पालकांनी या घटनेनंतर शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला आहे. राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर आसे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी या शिक्षकास अटक करून श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.

2 मुलांना विहिरीत फेकलं, पत्नीचा दाबला गळा; डॉक्टरने स्वतःसह संपवलं कुटुंब, पुणे हादरलं
News18लोकमत
News18लोकमत

या शिक्षकाकडून सदर पीडितेबाबत हा अत्याचार जानेवारी 2023 ते 14 जून 2023 दरम्यान घडला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासह पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात